

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इवाना ट्रम्प यांचे निधन झाले आहे. ( Ivana Trump Death ) त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्याचे ह्दयविकाराने निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रम्प यांना तीन मुले आहेत. दरम्यान, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये इवाना यांच्या शरीरावर जखमा झाल्याचा खुलासा करण्यात आला आहे. या जखमा कशामुळे झाल्या याचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला नाही. यामुळे त्याचा मृत्यू हद्यविकाराने झाला की अपघातामुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घरातील जिन्याजवळ इवाना यांचा मृतदेह आढळला. जिन्यातून पडल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. न्यूयॉर्क पोलीस विभागाच्या प्रक्क्त्यांनी सांगितले की, इवाना ट्रम्प या बेशुद्ध असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. घरातील जिन्याजवळ त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर आपल्या पहिल्या पत्नीच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, इवाना ही एक अत्यंत सुंदर महिला होता. तिने एक महान आणि प्रेरणादायक जीवन व्यतीत केले. डोनाल्ड ज्युनिअर, मुलगी इवांका आणि एरिक ट्रम्प ही मुले आमच्यासाठी गर्व होती. इव्हाना यांच्या निधनामुळे ट्रम्प कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मुलगी इवांका ट्रम्पने ट्वीट केले आहे की, आईच्या निधनामुळे मन व्यथित झाले आहे. आई भावुक आणि विनोदी होती. ती एक परिपूर्ण जीवन जगली. हसण्याची आणि नृत्य करण्याची संधी तिने साेडली नाही. तिची मला नेहमी आठवण येईल. तिच्या आठवणी नेहमीच माझ्या हृदयात जिवंत राहतील.
एरिक ट्रम्पने म्हटले आहे की, आमची आई महान महिला होती. व्यवसायात तिची एक वेगळी ओळख होती. एक आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू, एक सुंदर स्त्री आणि काळजी घेणारी आई आणि मैत्रीणीचे आज निधन झाले.
इवाना ट्रम्प यांचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते. तर आई टेलिफोट ऑपरेटर होती. १९७६ मध्ये इवाना या एका मॉडल ग्रुपमध्ये सहभागी झाल्या. १९७६ मध्ये एका कार्यक्रमावेळी त्यांची उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ७ एप्रिल १९७७ रोजी त्यांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर विवाह झाला. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्योगाचा आलेख वाढला. इवाना यांचीही त्यांना मदत झाली. दोघांनी अनेक प्रोजेक्टवर एकत्रीत काम केले. यामध्ये मॅनहटन शहरातील ट्रम्प टॉवर, न्यू जर्सीमधील ट्रम्प ताज महल कॅसिनो रेजार्ट, न्यूयॉर्कमधील ग्रँड हयात हॉटेल याप्रोजेक्टचा समावेश होता. ८०च्या दशकात ट्रम्प दाम्पत्याचा समावेश हायप्रोफाईल दाम्पत्यांमध्ये होत होता. ८०च्या दशकात डोनाल्ड ट्रम्प यांची माध्यमांमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात इवाना यांचे मोठे योगदान होते.
१९८९ नंतर डोनाल्ड यांचे नाव मार्ला मेपल्सबरोबर जोडले जावू लागले. यानंतर डोनाल्ड यांच्याबरोबर इवाना यांचे मतभेद सुरु झाले. १९९२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. इवाना या यशस्वी उद्योजिकेसह एक लेखिकाही होत्या.
हेही वाचा :