Elephant Rescue Viral Video : पिलाला वाचविताना हत्तीण झाली बेशुद्ध; रेस्क्युचा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक | पुढारी

Elephant Rescue Viral Video : पिलाला वाचविताना हत्तीण झाली बेशुद्ध; रेस्क्युचा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल होत आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल. ही घटना थायलंड येथील नेकहोन नयोक प्रांतातील अभयारण्यातील आहे. या ठिकाणी एक हत्तीचे पिल्लू एका खड्यात पडले होते. त्याला वाचविण्यासाठी व मदतीसाठी त्या पिलाची आई जोर जोरात ओरडत होती. यानंतर ती हत्तीण तिच्या पिलाला वाचविण्याचा प्रयत्न करु लागली. या प्रयत्नात ती थकली आणि बेशुद्ध पडली (Elephant Rescue viral video). हा सगळा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला. या आईची पिलाला वाचविण्याची चाललेली धडपण पाहूण जो तो भावूक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

त्याचे घडले असे की, थायलंड मधील नेकहोन नयोक प्रांतातील या अभयारण्यातील एका छोट्या खड्ड्यात हत्तीचे छोटे पिल्लू पडले. या पिल्लाची आई त्या पिलाला खड्ड्यातू काढण्यासाठी व मदत मागण्यासाठी जोर जोरात ओरडू लागली. नंतर ती हत्तीण स्वत:च पिलाला वर काढण्यासाठी त्या खड्ड्यात उतरुन प्रयत्न करु लागली. पण, तिला काही केल्या आपल्या पिलाला बाहेर काढता येईना. या अथक प्रयत्नात ती फारच दमून गेली व खूप थकल्याने ती अचानक बेशुद्ध पडली. (Elephant Rescue viral video)

हा प्रकार माहिती होताच त्या ठिकाणी वेळीच रेस्क्यु टिम पोहचली. त्यांनी खड्ड्यात बेशुद्ध पडलेल्या हत्तीणीला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले. तिला खड्ड्यातू वर काढल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तिच्यावर तात्काळ उपचार करुन तिला शुद्धीत आणले. वेळीच उपचार झाल्याने त्या हत्तीणीचे प्राण वाचले. शिवाय क्रेनच्या सहाय्याने तिच्या पिलाला देखिल बाहेर काढण्यात आले. उपचारानंतर हत्तीण उठली आणि तिच्या पिलाला घेऊन जंगलात निघून गेली. (Elephant Rescue viral video)

Elephant Rescue Viral Video

हा सर्व घटनाक्रम चित्रित करण्यात आला आहे. तसेच याची क्लिप सध्या सोशल मीडियामध्ये वायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वजण भावूक होत आहेत. तसेच हा व्हिडिओ पाहून युजर्स या हत्तीण व तिच्या पिलाला वाचविणाऱ्या रेस्क्यु टिमला हिरो म्हणत आहेत.
या व्हिडिओची पोस्ट वायरल झाल्यावर तब्बल ५८ हजार हून अधिक लाईक्स मिळाले. तर १९ हजारहून अधिक युजर्सनी याला रीट्वीट केले आहे. शिवाय या व्हिडिओला १५ लाख इतके व्ह्युज मिळाले आहेत. या सोबत शेकडो लोकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

Back to top button