Sushmita Sen And Lalit Modi : सुष्मिताने ललित मोदीसोबतच्या नात्याबाबत केला मोठा खुलासा; म्हणाली ‘आता खूप झाले खुलासे…’

Sushmita Sen And Lalit Modi : सुष्मिताने ललित मोदीसोबतच्या नात्याबाबत केला मोठा खुलासा; म्हणाली ‘आता खूप झाले खुलासे…’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाई डेस्क : माजी मिस युनिव्हर्स तथा अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen And Lalit Modi) हिने अखेर ललिद मोदी यांच्या सोबत डेटिंग बाबत मौन सोडत मोठा खुलासा केला आहे. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी सुष्मिता सेन सोबतचे मालदिव येथील फोटो शेअर केल्यानंतर या दोघांनी लग्न केल्याच्या चर्चांना उधान आले होते. या सर्व गोष्टींवर आता सुष्मिता सेन हिने मौन सोडत इंस्टाग्रामवर पोस्ट करत अगदी स्पष्टपणे लिहले आहे की 'आता बास झाले खूप दिले खुलासे'.

आयपीएलचे माजी अध्यक्ष तसेच आयपीएलमध्ये घोटाळा प्रकरणी आरोपी ठरविण्यात आलेले व देश सोडून परागंदा झालेले ललित मोदी यांनी गुरुवारी (दि.१५ जुलै) सुष्मिता सेन (Sushmita Sen And Lalit Modi) हिच्या सोबतचे फोटो ट्विटरवर शेअर केले. या ट्विट नंतर या दोघांचे लग्न झाले असल्याच्या अफवांना आणि बातम्यांना ऊत आला होता. या सर्व प्रकरणा नंतर पुन्हा ललित मोदी यांनी आणखी एक ट्वीट करत हे स्पष्ट केले आम्ही दोघे एकमेकांना डेट करत आहोत आणि लवकरच लग्न देखिल करु. या सर्व प्रकरणावरुन आता अभिनेत्री सुष्मिता सेन हिने इनस्टाग्रामवर खुलासा केला आहे.

अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen And Lalit Modi) हिने इन्स्टाग्रामवर आपल्या मुली सोबतचा फोटो टाकून लिहले आहे की, मी खुप खुश आहे. अद्याप मी लग्न केलेले नाही व साखरपुडा देखिल केला नाही आणि खूप झाले खुलासे…

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिताने लिहले आहे, "मी सध्या खूप आनंदी आहे, ना लग्न झालंय, ना कुठला साखरपुडा… माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारे माझ्यासोबत आहेत. पुरे आता हे स्पष्टीकरण, आता कामं करा. आपलं आयुष्य जगा. माझ्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल खूप धन्यवाद… आणि जे नाही झालेत, हे तुमच्या कामचंही नाही. खूप खूप प्रेम!"

आयपीएलमधील घोटाळा, मनी लॉन्ड्रींग मध्ये आरोपी असणारे ललित मोदी हे २०१० पासून भारत सोडून गेले आहेत. ते सध्या लंडनमध्ये राहतात. भारत सरकार कडून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत पण यात अद्याप यश आलेले नाही. तर १९९४ साली मिस युनिव्हर्स बनलेली सुष्मिता सेनने हिंदी चित्रपट सृष्टीत अभिनेत्री म्हणून नाव कमावले आहे. बॉलिवूडमध्ये तिचे अनेकांशी नाव जोडले गेले. सध्या पुन्हा एकदा ललित मोदी यांच्याशी सुष्मिता सेनचे नाव जोडले गेल्याने यांच्या नव्या प्रेम कहाणीच्या चर्चा सुरु आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news