'सेक्स स्कँडल'कडे दुर्लक्ष करणे ब्रिटनच्‍या पंतप्रधानांना भोवले : जाणून घ्‍या, काय आहे प्रकरण? | पुढारी

'सेक्स स्कँडल'कडे दुर्लक्ष करणे ब्रिटनच्‍या पंतप्रधानांना भोवले : जाणून घ्‍या, काय आहे प्रकरण?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा देण्यास सहमती दर्शविली आहे. नवनियुक्त मंत्री आणि इतर ५० हून अधिक जण बंडखोरी करून जॉन्सन सरकारमधून बाहेर पडल्‍याने त्‍यांनी हा निर्णय घेतला आहे.  जॉन्सन एकाकी पडले आहेत असून, सहकारी ख्रिस पिंचर (Chris Pincher) यांच्‍या ‘सेक्स स्कँडल’कडे कानाडोळा करणे जॉन्‍सन यांना भलतेच महागात पडले आहे.

Chris Pincher : समर्थक मंत्र्यांनी राजीनामा दिल्‍याने जॉन्‍सन अडचणीत

आतापर्यंत बोरिस जॉन्‍सन यांच्‍या मंत्रीमंडळातील ४१ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. विशेष म्‍हणजे जॉन्‍सन यांचे कट्‍टर समर्थक मंत्र्यांनी राजीनामा दिल्‍याने त्‍यांची अडचण वाढली आहे. मागील वेळेस ऋषि सुनक और साजिद जाविद यांनी घेतलेल्‍या पुढाकारामुळे जॉन्‍सन पुन्‍हा पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. मागील महिन्‍यातच त्‍यांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला होता. काँझर्व्हेटिव्ह पार्टीतील नियमांनुसार विश्‍वासदर्शक ठराव जिंकल्‍यानंतर एक वर्ष पुन्‍हा असा ठराव दाखल करता येत नाही. यानंतरही मंत्रीमंडळातील अनेक मंत्री हे जॉन्‍सन यांनी राजीनामा द्‍यावा या मागणीवर ठाम होते.

नेमकं काय आहे प्रकरण ?

बीबीसीच्‍या रिपोर्टनुसार, काँझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार ख्रिस पिंचर हे पंतप्रधान बोरिस जॉन्‍सनचे निकटवर्ती मानले जातात. फेब्रुवारीमध्ये जॉन्सन यांनी ख्रिस पिंचर (Chris Pincher) यांनी पक्षाच्या डेप्युटी चीफ व्हीप म्हणून नियुक्ती केली होती. दारुच्‍या नशेत लैंगिक अत्‍याचार केल्‍याचे आरोप पिंचर यांच्‍यावर आहेत. लैंगिक शोषणाचे ६ गुन्‍हे त्‍यांच्‍याविरोधात दाखल झाले होते.सेक्‍स स्कँडलमधील सहभागामुळे यांच्‍या नियुक्‍तीला विरोधी पक्षाच्‍या सदस्‍यांसह जॉन्‍सन यांच्‍या सहकार्‍यांनी आक्षेप घेतला होता. पिंचर यांनी लंडनमधील एका क्लबमध्ये दोन युवकांना आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला होता, असा दावा ३० जून रोजी ‘द सन’च्या वृत्ताने करण्‍यात आला होता. यानंतर इंग्‍लंडमध्‍ये एकच खळबळ माजली होती.

पिंचर यांनी केलेल्‍या लैंगिक शोषणाची माहिती असतानाही जॉन्‍सन यांनी त्‍यांना बढती दिली. याच निर्णय त्‍यांच्‍यासाठी अडचणीचा ठरला आहे. या निर्णयामुळे विरोधी पक्षांसह स्‍वपक्षीय खासदारही त्‍यांच्‍या नेतृत्त्‍वावरच सहकारी प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित करु लागले. पिंचर यांच्या नियुक्तीमुळे जॉन्सन यांच्या विरोधात बंडखोरी सुरु झाली. वाढत्‍या विरोधातमुळे पिंचर यांना बढती देणे हा चकुीचा होता, अशी कबुलीही जॉन्‍सन यांनी दिली होती. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

जॉन्‍सन यांचे समर्थक आणि अर्थमंत्री ऋषी सूनक यांच्या राजीनाम्यानंतर बोरिस जॉन्सन यांची खुर्ची अडचणीत आली होती. त्यांनी ५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी देखील राजीनामा दिल्‍यानंतर जॉन्‍सन यांच्‍या राजीनामा देणार अशी चर्चा सुरु झाली होती. अखेर जॉन्‍सन यांनी पंतप्रधानपद सोडण्‍याची तयारी दर्शवली आहे. वास्‍तविक जॉन्‍सन यांनी वेळीच ठोस कारवाई केली असती तर त्‍यांच्‍यावर ही नामुष्‍की ओढावली नसती, अशी चर्चा इंग्‍लंडच्‍या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा :

Back to top button