अफगाणिस्तान काबिज करणाऱ्या तालिबान आणि अफूचं कनेक्शन या आणि इतर ४ बातम्या | पुढारी

अफगाणिस्तान काबिज करणाऱ्या तालिबान आणि अफूचं कनेक्शन या आणि इतर ४ बातम्या

तालिबानने तब्बल २० वर्षांनंतर अफगाणिस्तानवर कब्जा केलेला आहे. अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी अफगाणिस्तानातून त्यांच्या फौजा मागे घेतल्या आहेत. तर दुसरीकडे चीन, पाकिस्तान, रशिया अशा देशांनी तालिबानच्या सरकारला मान्यता दिली आहे. तालिबान संदर्भातील या आठवड्यातील ५ महत्त्वाच्या बातम्या अशा : ( बातमी सविस्तर वाचण्यासाठी हेडलाईनवर क्लिक करा )

  1. तालिबान आणि अफूचं काय आहे कनेक्शन? – तालिबानने गेल्या २० वर्षांत अफू आणि हेरॉईनच्या व्यापारातून अब्जावधी रुपये मिळवले आहेत. हा पैसाच त्यांना सत्तेपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
  2. तालिबान आहे तरी कोण? – तालिबानचा उदय १९९०च्या दशकात झाला. सुरुवातीला पाकिस्तानात ही चळवळ सुरू झाली आणि त्यानंतर काही वर्षांत त्यांनी अफगाणिस्तानवर कब्ज केला.
  3. तालिबानचा म्होरक्या हिब्तुल्लाह आहे तरी कोण? – हिब्तुल्लाह अखुंदजादा याला अमीर-अल-मोमिनीन म्हणजे अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  4. तालिबानला पैसा कोण पुरवतो? – अफगाणिस्तान हा तसं पाहिलं तर मागस देश आहे. पण तालिबानकडे पैसा कुठून येतो, या प्रश्नाचं उत्तर देणारा हे लेख.
  5. पाहा व्हिडिओ – तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर देशातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी विमानतळावर गर्दी केली. त्याचा हा व्हिडिओ

Back to top button