अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पडले सायकलवरून | पुढारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पडले सायकलवरून

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे काल (शनिवारी) सायकल चालवत असताना त्यांचे संतुलन बिघडले आणि ते पडले. सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांना उठण्यासाठी मदत केली. त्यानंतर मी बरा आहे, असे बायडेन यांनी सांगितले. दरम्यान, व्हाईट हाऊसच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, सायकलवरून उतरताना बायडेन यांचे शूज पायडलमध्ये अडकले. यामुळे त्यांचे संतुलन बिघडले व ते पडले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 79 वर्षीय बायडेन सध्या डेलावेयर राज्यात सुट्टीवर आहेत. रेहोबोथ बीचवर पत्नी जिल बायडेनसोबत ‘मॅरेज अ‍ॅनिव्हर्सरी’ साजरी करण्यासाठी ते आले आहेत. तेथीलच स्टेट पार्कमध्ये सायकल चालवताना बायडेन पडल्याची घटना घडली.

हेही वाचा

Back to top button