Bill Gates Summer Favorite Books : बिल गेट्‍स यांनी यंदा सुचवली ‘ही’ पाच पुस्‍तके, वाचाल तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलेल | पुढारी

Bill Gates Summer Favorite Books : बिल गेट्‍स यांनी यंदा सुचवली 'ही' पाच पुस्‍तके, वाचाल तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलेल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
बिल गेट्स हे काेणी उच्‍चारले की, आपल्‍या डोळ्यासमोर मागील काही दशकांमध्‍ये कम्‍प्‍युटरमुळे ( संगणक क्रांती) बदलेले जग समोर येते. एक व्‍यक्‍ती आपल्‍या संशोधन वृत्ती आणि कृतीतून जग बदलण्‍याचे स्‍वप्‍न पाहतो. अथक प्रयत्‍नातून हे स्‍वप्‍न साकारतोही. बिल गेट्‍स यांनी आपल्‍या सकारात्‍मक दृष्‍टीकोनातून सर्वसामान्‍यांच जगणं अधिक सुखकर कसे होईल, याचे स्‍वप्‍न पाहिले. आणि ते वास्‍तवात उतरवलही. यामागे त्‍यांचे अथक प्रयत्‍न आहेतच. त्‍याचबरोबर त्‍यांच्‍या सकारात्‍मक दृष्‍टीकोनही आहे. हा दृष्‍टीकोन तयार हाेण्‍या मागे  वाचनाच हाही महत्त्‍वाचा घटक आहे. गेट्‍स यांना वाचनाचा छंद आहे. दरवर्षी ते उन्‍हाळ्याच्‍या सुट्‍टीत त्‍यांना भावलेली पाच पुस्‍तकांची यादी ( Bill Gates Summer Favorite Books ) जाहीर करतात. सुट्‍टीच्‍या दिवसात ही पुस्‍तके वाचा, असा सल्‍लाही ते देतात. यंदाही त्‍यांनी पाच पुस्‍तकांची यादी दिली आहे. जाणून घेवूया, बिल गेट्‍स यांना या वर्षी भावलेल्‍या पाच पुस्‍तकांविषयी…

1- The Power

बिल गेट्स यांनी सूचवलेल्‍या यादीतील पहिले पुस्‍तक आहे द पॉवर ( The Power). ही कांदबरी तुम्‍ही वाचा, असे बिल गेट्‍स यांना त्‍यांच्‍या मुलीने सूचवले होते. ब्रिटिश लेखक नाओमी अल्‍डरमॅन यांची ही कादंबरी आहे.जगभरातील महिलांना शरीरात समाेरील व्‍यक्‍तीला एक घातक वीजेचे झटके देणारी शक्‍ती प्राप्‍त झाल्‍यावर काय होते, महिला या शक्‍तीने स्‍वत:चे संरक्षण कसे करतात. या कल्‍पनेवर आधारीत ही कादंबरी आहे. ही कादंबरीतून आजवर जगभरात महिलांना देण्‍यात आलेल्‍या दुय्‍यम वागणूक आणि अन्‍यायाची माहिती मिळतेच. त्‍याचबराेबर अमेरिकेसह जगभरातील सर्वच देशांमधील महिलांवर होणार्‍या अन्‍यायाला वाचा फोडणार्‍यांविषयी ही तुम्‍ही कृतज्ञता व्‍यक्‍त करता. महिला समानतेविषयीची ही कादंबरी तुम्‍ही नक्‍की वाचा असे गेट्‍स यांनी सुचवले. आहे.

2- Why We’re Polarized

गेट्‍स यांनी सुचवलेले ( Bill Gates Summer Favorite Books ) दुसरे पुस्‍तक आहे एजरा क्लेन यांचे Why We’re Polarized. हे पुस्‍तक अमेरिकेतील राजकीय धुव्रीकरणावर भाष्‍य करते. या पुस्‍तकाबाबत गेट्‍स म्‍हणतात, ” मी तसा भविष्‍याबाबत सकारात्‍मक आहे; पण राजकीय धुव्रीकरणामुळे एक गट तुमच्‍या निर्णय प्रक्रियेवर कसा प्रभाव टाकतो. हे पुस्‍तक अमेरिकेच्‍या मूळ राजकारणावर आहेच त्‍याचबरोबर मानवाच्‍या मानसिकतेवरही भाष्‍य करते. विशेष करुन राजकारणाचा विषय येतो तेव्‍हा तुम्‍ही नक्‍की हे पुस्‍तक वाचा. कारण आपण ज्‍या समुहात राहतो यातूनच आपल्‍याला निर्णय घेण्‍यास मार्गदर्शन मिळते. ही मानवी प्रवृत्ती असल्‍याचे हे पुस्‍तक अधोरेखित करते. तुम्‍हाला आपलं भोवताल आणि राजकारण समजून घेण्‍यासाठी हे पुस्‍तक जरुर वाचा, असे गेट्‍स सांगतात.

3- The Lincoln Highway

गेट्‍स यांच्‍या यादीतील तिसरे पुस्‍तक आहे The Lincoln Highway. याचे लेखक आहेत अमेरिकेतील प्रख्‍यात कादंबरीकार ओमर टॉवेल. या कादंबरीतील कथा ही १९५०च्‍या दशकातील १८ वर्षीय एम्‍मेट वॉटसन यांची आहे.  आई-वडिलांच्‍या मृत्‍यू नंतर एम्‍मेट हा आपला आठ वर्षाच्‍या भावाला घेवून युरोमध्‍ये जाण्‍याचे फ्‍लॅनिंग करतो. येथे जावून नव्‍याने जगणं सुरु करण्‍याचा त्‍याचा विचार असतो. मात्र वॉटसन याला वर्क फार्मचा रखवालदार आपल्‍या घरी घेवून जाताे. या प्रवासात त्‍याला जगण्‍यातील अनेक नव्‍या गोष्‍टी उमगतात. ही कादंबरी तुम्‍हाला तुम्‍ही विचार करता तसे कधीच जीवन नसते, हे शिकवते तसेच मानवी जीवनातील नात्‍यांचे महत्त्‍वही सांगते, तसेच असे गेट्‍स यांनी म्‍हटलं आहे.

4- The Ministry for the Future

गेट्‍स यांच्‍या यादीतील चौथे पुस्‍तक आहे The Ministry for the Future. मागील वर्षी मी माझ्‍या जलवायू  परिवर्तनावरील पुस्‍तकाचा प्रचार करतो होतो तेव्‍हा मला किम स्‍टॅनली रॉबिन्‍सन यांचे The Ministry for the Future वाचा, असे अनेकांनी सुचवले. या कादंबरीत अनेक मुद्‍यांवर नाट्यमय रुपात प्रकाश टाकला आहे. हे एक उत्‍कृष्‍ट पुस्‍तक असल्‍याचे गेट्‍स यांनी नमूद केले आहे.

5- How the World Really Works

तुम्‍हाला मानवी जीवनाला आकार देणार्‍या मुलभूत शक्‍तींबाबत संक्षिप्‍त; परंतू संपूर्ण माहित हवी असल्‍यास लेखक वक्लाव स्मिल यांचे How the World Really Works हे पुस्‍तक जरुर वाचा. हे पुस्‍तक तुमचं जगण्‍याचा दृष्‍टीकोनच बदलेल, असा विश्‍वास बिल गेट्‍स यांनी व्‍यक्‍त केला आहे.

एकुणनच गेट्‍स यांनी सुचवलेली पुस्‍तके तुम्‍ही वाचल्‍यास तुम्‍ही अधिक प्रग्‍लभ व्‍हाल. त्‍याचबराेबर  तुमचा दृष्‍टीकाेन बदलासही मदत हाेईल. कारण वाचनाचा छंद हा तुमचं व्‍यक्‍तिमत्त्‍व अधिक समृद्‍ध करतो. गेट्‍स यासाठीच दरवर्षीच्‍या सुट्‍टीत पाच पुस्‍तकांची यादी जाहीर करण्‍याचा उद्‍देशही हाच आहे.

हेही वाचा : 

Back to top button