इम्रान खान : पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून तालिबान्यांचं कौतुक  | पुढारी

इम्रान खान : पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून तालिबान्यांचं कौतुक 

काबूल, पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने काबीज केली आहे, हा एक जागतिक स्तरावर चिंतेचा विषय ठरलेला आहे. अफगाणिस्तानमधील सामान्य नागरिक जीव मुठीत घेऊन त्या देशातून पळून जाण्यासाठी धडपडताहेत. अशा परिस्थिती पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी म्हणजेच इम्रान खान यांनी तालिबानच्या कृत्याचे आणि सत्ताकारणाचे स्वागत केले आहे.

इम्रान खान म्हणतात की, “अफागाणिस्ताने गुलामीचे जोखड फेकून दिले आहे.” अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या या कृत्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर टीका करण्यात येत आहे. पाकिस्तानच तालिबान्यांना मदत पुरवत असल्याचा आरोप जगभरातून होत आहे.

पाकिस्तानी लष्कर, आयएसआयकडून तालिबान्यांना मदत केली जात आहे, असे आरोप होत असताना पाकिस्तानने हे सर्वच्या सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. असं असलं तरी पाकिस्तानचे पंतप्रधान वरील वक्तव्य करून दुटप्पी भूमिका घेत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

“बौद्धिक आणि मानसिक गुलामीचे जोखड फेकून देणे कठीण आहे. पण, अफगाणिस्तानने हे जोखड फेकून दिले आहे”, असे वक्तव्य करत असल्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते तालिबान्यांचे समर्थन करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

जागतिक स्तरावर या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानमध्ये अनेक देशांनी आपापले दूतावासाची कार्यालये बंद केलेली आहेत. पण रशिया आणि चीनने आपली कार्यालयं सुरुच ठेवली आहेत. रशिया आणि चीन अफगाणिस्तानमधील तालिबान्याचे वर्चस्व मान्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पहा व्हिडीओ : अफगाणिस्तानमध्ये दहशतीचा हाहाकार! उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

Back to top button