China Coca Cola death: १० मिनिटांत १.५ लिटर कोल्ड ड्रिंक प्यायल्याने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक कारण

१० मिनिटांत १.५ लिटर कोका-कोला प्यायलेल्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Coca Cola
Coca ColaFile Photo
Published on: 
Updated on: 

China Coca Cola death

बीजिंग : चीनची राजधानी बीजिंगमध्ये अवघ्या १० मिनिटांत १.५ लिटर कोका-कोला प्यायलेल्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेगाने सॉफ्ट ड्रिंक प्यायल्यामुळे त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर वायू तयार झाला. यामुळे त्याच्या यकृताचा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला आणि अखेरीस त्याचा मृत्यू झाला.

‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर सुमारे सहा तासांनी तरुणाच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्याला बीजिंगमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीच्या तपासणीत त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते, श्वासोच्छ्वास कमी झाला होता आणि रक्तदाब अत्यंत कमी झाला होता. त्याला 'इस्केमिक हिपॅटायटीस' (ज्याला 'शॉक लिव्हर' असेही म्हणतात) झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या मते, यकृताला होणारा रक्तपुरवठा कमी किंवा बंद झाल्यास ही गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.

Coca Cola
Crime News: महिन्यात ५ वेळा त्याच लॉजवर गेले, अन् शेवटी...; २२ वर्षीय विद्यार्थिनीसोबत नेमकं काय घडलं?

उपचार सुरू झाल्यानंतर १८ तासांनी मृत्यू

‘क्लिनिक्स अँड रिसर्च इन हेपॅटोलॉजी अँड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, कमी वेळेत मोठ्या प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक प्यायल्यामुळे त्याच्या आतड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वायू तयार झाला. हा वायू यकृताच्या प्रमुख रक्तवाहिनीत गेल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

तरुणाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी औषधोपचार सुरू केले होते. मात्र, १२ तासांनंतर करण्यात आलेल्या तपासणीत यकृताला गंभीर इजा झाल्याचे स्पष्ट झाले. अखेर रुग्णालयात दाखल केल्यानंतर १८ तासांनी त्याचा मृत्यू झाला. या घटनेपूर्वी तो पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगण्यात आले.

तज्ज्ञांनी अहवालातील दाव्यावर व्यक्त केला संशय

या प्रकरणावर कोका-कोला कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे जैवरसायनशास्त्राचे प्राध्यापक नॅथन डेव्हिस यांनी या घटनेच्या कारणाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. केवळ सॉफ्ट ड्रिंक प्यायल्यामुळे अशा प्रकारे मृत्यू होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे डेव्हिस यांनी म्हटले आहे. शरीरात मोठ्या प्रमाणात वायू तयार होण्यामागे जिवाणूंचा संसर्ग असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. कोका-कोला प्यायल्यानंतर या संसर्गामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली असावी, असा त्यांचा अंदाज आहे. या घटनेचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी अधिक वैद्यकीय तपासण्यांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Coca Cola
Crime News: प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा मृत्यू; चार मजली इमारतीवरून उडी, प्रायव्हेट पार्ट कापलेल्या अवस्थेत सापडला, काय घडलं?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news