Sheep : महिलेच्या हत्येमध्ये ‘मेंढ्या’ला ३ वर्षांचा तुरुंगवास | पुढारी

Sheep : महिलेच्या हत्येमध्ये 'मेंढ्या'ला ३ वर्षांचा तुरुंगवास

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर कधी कोणते व्हिडीओ किंवा बातम्या व्हायरल होतील सांगता येत नाही. असे व्हिडीओ-बातम्या बघितल्यानंतर हसावं की रडावं, हेच कळत नाही. कधी-कधी तर आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. अशीच एक बातमी तुम्हाला सांगायची आहे, जी ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या कानावरच विश्वास बसणार नाही. (Sheep)

तुम्ही आतापर्यंत न्यायालयाकडून गुन्हेगाराला तुरुंगवास होताना पाहिलं असेल. पण, कधी एखाद्या आरोपाखाली चक्क जनावराला तुरुंगात धाडलेलं तुम्ही ऐकलंय? नाही ना? तर हे माहीत करून घ्या की, एका महिलेला निर्दयीपणे जखमी करत तिला मृत्यूच्या खाईत उतरविणाऱ्या मेंढ्याला… हो हो तुम्ही ऐकलंत ते बरोबर आहे… एका मेंढ्याला चक्क ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही विचित्र शिक्षा सुनावताना या मेंढ्याला एक आठवडा पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आलं होतं. (Sheep)

हत्येच्या आरोपाखाली माणसाला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेली पाहिले असेल; पण हत्येच्या आरोपाखाली मेंढ्याला झालेली ३ वर्षांची शिक्षा तुम्ही पहिल्यांदाच ऐकली असेल. सोशल मीडियावर या बातमीने धुमाकूळ घातला आहे. ४० वर्षांच्या महिलेला एका मेंढ्याने निर्यदीपणे हत्या केली. त्या मेंढ्याला ३० वर्षांची शिक्षा झाल्याची बातमी वेगाने व्हायरल झाली आहे. ही घटना दक्षिण सूडान येथील आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मेंढ्याने आपल्या शिंगाने महिलेवर हल्ला केला. त्यामध्ये महिलेच्या शरीरातील हाडांना जबर दुखापत झाली. महिला त्यानंतर बेशु्द्ध झाली. त्यानंतर ही मेंढा तेथून निघून गेला. गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करत असतानाच मधेच महिलेने जीव सोडून दिला. मेंढ्याला अटक करण्यात आली. महिलेच्या हत्येसंदर्भात दोषी ठरविण्यात आले. मेंढ्याच्या मालकाला पीडित महिलेच्या कुटुंबाला ५ गायी देण्याचे आदेश देण्यात आले.

Back to top button