Sleeping Hours : ‘या’ कारणामुळे तुमची वर्षाची झोप ५८ तासांनी होणार कमी!

Sleeping Hours : ‘या’ कारणामुळे तुमची वर्षाची झोप ५८ तासांनी होणार कमी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : हवामानातील बदलामुळे २०९९ पर्यंत लोकांची झोप ही ५०-५८ तासांनी कमी होणार असल्याचे एका अभ्यासानुसार समोर आले आहे. वन अर्थ जर्नलमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासात संशोधकांनी ६८ देशांतील ४७ हजारांपेक्षा अधिक प्रौढ लोकांच्या झोपेचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. (Sleeping Hours)

नॅशनल स्लीप फाऊंडेशनच्या मतानुसार, प्रौढांनी ७ ते ९ तासांची झोप घेतली पाहिजे. १०-५ अंश सेल्सियस बेसलाईन तापमानाच्या तुलनेत बाहेरील रात्रीचे तापमान हे २५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान असेल तर लोकांची झोप ही ३.५ टक्क्याने वाढली, असे अभ्यासात स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात तज्ज्ञ एलेक्स अगोस्टिनी म्हणतात की, "३.५ टक्क्यांनी झोप कमी होणे, हा आकडा कमी वाटू शकतो; पण त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. योग्य झोप मिळाली नाही, तर एकाग्रतेमध्ये समस्या येतात. रक्तवाहिन्या व हृदयासंबंधी रोग उद्भवतात."

या अभ्यासाचे प्रमुख आणि लेखक केल्टन मायनर म्हणतात की, "जर रात्रीच्या वातावरणातील तापमान ३० अंश सेल्सियस असेल तर एका व्यक्तीची झोप ही एक चतुर्थांशने कमी होते. याचाच अर्थ असा की, तरुण किंवा मध्यम वयाच्या माणसांच्या तुलनेत वयस्क लोकांनी दोन पटीने झोप गमावली. वाढत्या तापमानामुळे पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांच्या झोपेवरही २५ टक्क्यांनी परिणाम झाला आहे." (Sleeping Hours)

या अभ्यासातील पुरावे असे सांगतात की, उष्ण हवामानात राहणारे लोक थंड हवामानात राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त झोप गमवतात. पण, थंड हवामानातील लोक वातावरणाशी जुळवून घेतात. संशोधक मायनर म्हणतात की, "उष्ण ठिकाणी झोपेची मोठी हानी होते. या प्रदेशातील लोक उबदार वातावरणाशी जुळवून घेऊ शकत नाही. उष्ण प्रदेशात झोप कमी होण्याचे प्रमाण आणखी वाढेल. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यातील एक तृतीयांश वेळ झोपेत घालवत असतो. तरीही लोक पुरेशी झोप घेत नाहीत.

पर्यावरणपूरक इमारतींचे नियोजन गरजेचे

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, युनायटेड स्टेट्समधील एक तृतीयांश प्रौढांनी सांगितले की, "शिफारस करण्यात आलेल्या ७ ते ९ तासांच्या झोपेपेक्षा कमी झोप मिळते." एगोस्टिनी सांगतात की, "जागतिक तापमान वाढीमुळे लोकांच्या झोपेवर परिणाम होत आहे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. एअर कंडिशनिंगमुळे काही प्रमाणात लोकांची झोप वाढू शकते;  पण तो कायमचा उपाय होऊ शकत नाही. एअर कंडिशनिंगमुळे हरितगृह वायू उत्सर्जन होते, त्यामुळे तापमान वाढीला मदत होते. त्यामुळे जागतिक तापमान वाढीची समस्या सोडविण्यासाठी पर्यावरणपूरक इमारतींचे नियोजन आणि इतर उपाय अंमलात आणणे गरजेचे आहे."

पाहा व्हिडीओ : कोल्हापुरातील माऊली रथ नेते गरजूंपर्यंत जेवण

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news