Arrested: शहादा येथून सोनसाखळी चोरणाऱ्या महिलेला लासलगाव पोलिसांकडून अटक | पुढारी

Arrested: शहादा येथून सोनसाखळी चोरणाऱ्या महिलेला लासलगाव पोलिसांकडून अटक

नाशिक (लासलगाव) वार्ताहर : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथून व्यापाऱ्यास भुरळ घालून सोनसाखळी चोरणा-या महिलेस लासलगाव पोलीसांनी केली अटक केली आहे. अश्विन बाळकृष्ण सोनार रा. प्रकाशा तालुका शहादा यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाणे जिल्हा नंदुरबार येथे भादवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार – कांगणे, उप विभागीय पोलीस अधिकारी समरसिंग साळवे यांनी केलेल्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे लासलगाव पोलीस ठाणे हद्दीत दररोज गस्तसाठी साध्या वेशात पोलीस पथक तयार करण्यात आलेले आहे. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासी अधिकारी राजन मोरे सहा पोलीस निरीक्षक शहादा पोलीस ठाणे यांनी सोशलमीडियावर संशयित महिलांचे फोटो व्हायरल केले होते. या फोटोच्या आधारे संजयनगर, लासलगाव येथील महिला सरला कापसे (वय ३०) हिची तिच्या राहत्याघरी महिला अमंलदार सोनाली शिंदे यांनी अंग झडती घेतली. त्यात तिच्याकडे सोन्याच्या पोत, मनी, मंगळसूत्र मिळून आल्या.

महिलेची चौकशी केली असता, तीने मीना कापसे व रामदास शिंदे यांच्या सोबत परिणीता ज्वेलर्स, प्रकाशा. ता शहादा, जिल्हा नदुरबार येथून चोरी केली असल्याची कबुली दिली. या महिलेकडून अंदाजे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे. सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठुळे, पोहवा कैलास महाजन, पोना संजय देशमुख, उषा आहेर पो. कॉ. प्रदिप आजगे, सोनाली शिंदे, माया वाघ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा :

Back to top button