

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा
कुरकुंभ (ता. दौंड) येथील एमआयडीसी चौकात दोन चारचाकी वाहनांचा (कार) भीषण अपघात झाला. लोखंडी बॅरेकट तोडून दुभाजकाच्या पलीकडे जाऊन एक कार दुसऱ्या कारवर आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात एक ठार असून तीनजण गंभीर जखमी झाले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून एमएच ०४ एचएम ७९०६ ही कार भरधाव वेगाने पुण्याकडून सोलापुरकडे जात होती. कुरकुंभ हद्दीत या कारची एमआयडीसी चौकात नवीन बसवलेले लोखंडी बॅरेकतला जबर धडक लागली. धडकेनंतर ही कार थेट दुभाजकाच्या पलीकडे जाऊन सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या (एमएच ४२ के ७७५९) या दुसऱ्या कारवर समोरून जोरात आदळली. या अपघातात दोन्ही वाहनाच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. या वाहनांमधील एक जण ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी व मयत व्यक्तीचे नावे कळू शकले नाही. जखमींना पाटस (ता. दौंड) येथील खासगी रूग्णालयात दाखल केले असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा: