नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : कोरोना विषाणुंचं संकट अजून टळलेलं नाही. त्यात विविध व्हेरिएंट येत आहेत. आता त्यामध्ये आणखी एका मंकी बी व्हायरस याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकंच नाही, तर या व्हायरसमुळे बिजिंगमध्ये एकाचा मृत्यूदेखील झालेला आहे.
चीनमधील सीडीसी या साप्ताहिकांने यासंबंधी वृत्त दिलेले आहे. मार्च महिन्यात दोन माकडांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया ज्या डाॅक्टरांनी केली, त्याच डाॅक्टरांना याची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
मंकी बी व्हायरस हा मानवी शरीरावर अत्यंत परिणाम करणारा आहे. माकडांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर एका ५३ वर्षीय डाॅक्टरांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. त्यांना ताप, उलटी आणि न्युराॅजिकल त्रास होऊ लागला.
वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, २७ मे राजी त्यांचा मृत्यू झाला. संबंधित डाॅक्टरांच्या अनेक चाचण्या केल्यानंतर डाॅक्टरांना या व्हायरस झाल्याचं लक्षात आलं.
डाॅक्टरांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या चाचण्या करण्यात आल्या. सुदैवाने त्यांच्या चाचण्या हा निगेटिव्ह आल्या. या व्हायरस याची लागण झाली की, शरीरावर दाग, चकते येतात. हे महिनाभर शरीरावर असतात. त्वचेवर अनेक ठिकाणी फोड येतात. डोकेदुखी, अंगदुखी, थकवा जास्त जाणवतो.
व्हिडीओ पहा : खारघर धबधब्यावर अडकले ११८ पर्यटक
हे वाचलंत का?