व्लादिमीर पुतीन यांच्या जीवावर उठल्या पहिली पत्नी अन् पोटच्या पोरी! | पुढारी

व्लादिमीर पुतीन यांच्या जीवावर उठल्या पहिली पत्नी अन् पोटच्या पोरी!

मॉस्को ; वृत्तसंस्था : युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची पत जगभरात कमी झाली, हे अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांतून समोर आलेही; पण पुतीन यांची पत घरातही धोक्यात आलेली आहे. पुतीन यांचे कुटुंबच त्यांच्या जीवावर उठलेले आहे. पुतीन यांना पोटच्या मुली आणि पहिल्या पत्नीपासून धोका असल्याचा दावा करण्यात येत आहे.

‘डेली स्टार’च्या वृत्तानुसारही, ऑस्ट्रेलियन तज्ज्ञ डॉ. लिओनिड पेट्रोव्ह यांनी, पुतीन यांना मारणारे त्यांच्या खूप जवळचेच असतील, ती महिला असू शकते, कन्या, माजी पत्नीही असू शकते, असे म्हटलेले आहे. लग्‍नाच्या 30 वर्षांनंतर पुतीन यांनी 2013 मध्ये पहिली पत्नी ल्युडमिला पुतिना यांना घटस्फोट दिला होता. पुतीनपासून त्यांना दोन मुली आहेत.

मारिया फासेन आणि कॅटरिना तिखोनोवा. पुतीन हे लुईझा रोजोवा नावाच्या एका 18 वर्षांच्या मुलीचेही वडील असल्याची चर्चा होती; मात्र पुतीन यांनी ते मान्य केले नाही. व्लादिमीर पुतीन हे अलिना काबेवा या गर्लफ्रेंडच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. तीस वर्षांचा संसार मोडल्याचे शल्य ल्युडमिला यांना आहे, मारिया, कॅटरिना यांनाही आहेच; पण पुतीन यांच्यापर्यंत पोहोचणे हे तितकेसे सोपेही नाही. ते 24 तास प्रशिक्षित अंगरक्षकांच्या वेढ्यात असतात.

पुतीन अनेकांच्या निशाण्यावर…

पुतीन अनेकांच्या निशाण्यावर आहेत. पुतीन यांच्या मुलीही त्यांची हत्या करू शकतात, असा दावा गुप्‍तवार्ता विषयातील तज्ज्ञांनी केल्यानंतर पुतीन यांनी आपल्या स्टाफमध्ये मोठा बदल केला. स्वयंपाक्यापासून ते पहारेकर्‍यांपर्यंत हे बदल करण्यात आले. ‘क्रेमलिन’चे वरिष्ठ अधिकारीही पुतीन यांना पदावरून हटवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. पुतीन पायउतार झाले, तर त्यांच्या जागी माजी केजीबी एजंट अलेक्झांडर बोर्तनिकोव्ह हे रशियाचे नवे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात.

Back to top button