Bald : ऑफीसमध्‍ये कर्मचार्‍याला 'टकल्‍या' म्‍हणणे हे लैंगिक अत्‍याचारासारखेच! : 'या' देशाच्‍या कोर्टाचा निकाल - पुढारी

Bald : ऑफीसमध्‍ये कर्मचार्‍याला 'टकल्‍या' म्‍हणणे हे लैंगिक अत्‍याचारासारखेच! : 'या' देशाच्‍या कोर्टाचा निकाल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

ऑफीसमध्‍ये एखाद्‍या कर्मचार्‍याला टकल ( Bald ) पडलेले असेल आणि त्‍याला त्‍याला यावरुन हाक मारली जात असेल तर हे लैंगिक अत्‍याचारासारखच आहे, असा निष्‍कर्ष लंडनमधील कामगार न्‍यायालयाने नोंदवला आहे. न्‍यायमूर्ती जॉनथ ब्रेन यांच्‍या अध्‍यक्षतेखालील तीन सदस्‍यीय लवादाने  हा निष्‍कर्ष नोंदवला. डोक्‍यावर कसे कमी असतील तर यावर बोलणे हा अपमान आहे की अत्‍याचार यावर निकाल देताना, हा प्रकार लैंगिक अत्‍याचारच असल्‍याचे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले.

टोनी फिन हे वेस्‍ट यॉकशायरमधील ब्रिटिश बंग या कंपनीत इलेक्‍ट्रीशियन म्‍हणून नोकरीला होते. २०१९ मध्‍ये कंपनीतील तत्‍कालिन सुपरवायझर जॅमे किंग याच्‍याशी त्‍यांचा वाद झाला. यावेळी किंग याने फिन यांना टकल्‍या म्‍हणत त्‍यांची खिल्‍ली उडवली. तसेच तुला कामावरुन कमी केले जाईल, अशी धमकीही दिली होती. यावर फिन यांनी कामगार न्‍यायालयात दाद मागितली होती.

फिन याने दाखल केलेल्‍या तक्रारीवर कामगार न्‍यायालयासमोर फेब्रुवारीपासून सुनावणी सुरु आहे. या आठवड्यात पुन्‍हा एकदा सुनावणी सुरु झाली. यावेळी न्‍यायमूर्तींनी स्‍पष्‍ट केले की, महिला आणि पुरुष या दोघांना टकल असू शकते. पुरुषांमध्‍ये याचे प्रमाण अधिक आहे. एखादया व्‍यक्‍तीला डोक्‍यावर कसे नसतील तर त्‍याला टकल्‍या म्‍हणणे हे लैंगिक अत्‍याचारासारखच आहे, असा निष्‍कर्ष लवादाने नोंदवला.

Bald :…हे तर व्‍यक्‍तीच्‍या आत्‍मसन्‍मानला डिवचण्‍यासारखेच

एखादाला त्‍याच्‍या उणीवावरुन चिडवणे हे त्‍या व्‍यक्‍तीच्‍या आत्‍मसन्‍मानला डिवचण्‍यासारखेच आहे. त्‍यामुळेच आमच्‍या मते ‘टकल’ या एका खिल्‍ली उडवणे हा  लैंगिक अत्‍याचाराशीही निगडीत आहे. फिन यांना संबंधितांनी शारीरिक दुखापत केली नाही. मात्र त्‍याच्‍या केसावर बोलून त्‍याच्‍यावर मानसिक अत्‍याचारा केला, असेही लवादाने स्‍पष्‍ट केले. आता याप्रकरणी पुढील सुनावणीवेळी संबंधित कंपनीला टोनी फिन यांना देण्‍यात येणार्‍या नुकसान भरपाईवर होणार आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button