world’s oldest person : जगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन; दीर्घायुष्यासाठी ‘अशी’ होती दिनचर्या

world’s oldest person : जगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन; दीर्घायुष्यासाठी ‘अशी’ होती दिनचर्या
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणाला असे वाटत नाही की आपण दिर्घ आयुष्य जगावं. आपल्या सर्वांना हे सुंदर जग बघायचे आणि अनुभवायचे आहे. पण आजकाल वाईट जीवनशैलीमुळे लोकांचे वय कमी झाले आहे. तथापि, जगात असे लोक आहेत ज्यांचे वय १०० वर्षांहून अधिक आहे आणि ते आनंदी जीवन जगत आहेत. त्यापैकी एक जपानमधील रहिवासी केन तनाका (world's oldest person) असून त्यांचे नुकतेच वयाच्या ११९ व्या वर्षी निधन झाले आहे. तनाका (Kane Tanaka) या जगातील सर्वात वृद्ध महिला होत्या. 1903 मध्ये जन्मलेल्या तनाका यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.

दिर्घ काळ जगणाऱ्या व्यक्तींमध्ये तनाका (world's oldest person) यांची नोंद असले तरी त्यांनी जीवनात अनेक संघर्ष केला आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात दोनदा कर्करोगाचा पराभव केला आहे आणि 1918 स्पॅनिश फ्लू आणि कोविड-19 सारख्या दोन साथीच्या रोगांचाही सामना केला आहे. जेव्हापासून त्यांच्या निधनाची बातमी पसरली तेव्हापासून लोकांना त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य जाणून घ्यायचे होते. तनाकाच्या काही चांगल्या सवयींमुळे ती इतके दीर्घायुष्य जगू शकली. चला तर मग जाणून घेऊया जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेच्या काही चांगल्या सवयी, ज्या तिने आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारल्या.

विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी माइंड आणि बोर्ड गेम्स खूप चांगले मानले जाते. बोर्ड गेम खेळल्याने वृद्धापकाळात विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता टिकून राहते. एका अभ्यासानुसार असे लक्षात आले आहे की, जे लोक पत्ते आणि बुद्धिबळ सारखे बोर्ड गेम खेळतात ते आयुष्यभर अधिक मानसिकदृष्ट्या निरोगी असतात. वयाची ७० ओलांडल्यानंतरही त्यांची स्मरणशक्ती, विचार करण्याची गती आणि क्षमता पूर्वीसारखीच असते.

सतत वाचण्याची सवय (world's oldest person)

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वयाच्या 119 व्या वर्षीही तनाका रोज दुपारी अभ्यास करत असे. गणिताचे प्रश्न सोडवणे ही त्यांची सर्वात चांगली सवय होती. त्यामुळे त्याचा मेंदू सक्रिय राहण्यास खूप मदत झाली. नियमितपणे काहीतरी वाचल्याने स्मृतिभ्रंश होण्याचा धोका कमी होतो, जो वयानुसार वृद्धांमध्ये दिसून येतो. अभ्यासानुसार, वाचनामुळे तुमचे लक्ष, स्मरणशक्ती आणि संवाद कौशल्य सुधारते. एवढेच नाही तर ताण कमी करून दीर्घकाळ जगण्यास मदत करू शकते.

पहाटे लवकर उठण्याची सवय (world's oldest person)

तनाका या सकाळी लवकर उठत असत. त्या रोज सकाळी सहा वाजता उठायचा. संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक सकाळी लवकर उठतात ते लवकर झोपतात आणि आयुष्याचा आनंद घेतात. सकाळी लवकर उठण्याची सवय तुमच्या झोपेची गुणवत्ता वाढवते, ज्यामुळे तुमचा मूड आणि एकाग्रतेची पातळी सुधारते. एवढेच नाही तर लठ्ठपणा आणि इतर जुनाट आजारांचा धोकाही कमी होतो.

दीर्घायुष्यासाठी तुम्ही या गोष्टी देखील करू शकता (world's oldest person)

या सर्वांशिवाय सकस आणि स्वच्छ अन्न खाणे आणि नियमित व्यायाम करणे देखील दीर्घायुष्यासाठी प्रभावी ठरते. तनाका गेल्या 12 वर्षांपासून रिटायरमेंट होममध्ये राहत होत्या. त्यांना काही प्रमाणात ऐकण्यात येत नसे तसेच त्याव्हीलचेअर वापरत होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा परिस्थितीतही मन सक्रिय राहण्यासाठी त्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये व्यस्त राहात होत्या.

त्यामुळे जर तुम्हाला तनाका यांच्या सारखे दीर्घ आयुष्य जगायचे असेल तर त्याच्या चांगल्या सवयींना तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा. तुम्ही देखिल नक्कीच १०० वर्षांपर्यंत नक्कीच जगू शकाल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news