World’s Oldest Person : ११८ वर्षांच्‍या सिस्‍टर एंड्रे यांनी सांगितलं त्‍यांच्‍या दीर्घायुष्‍याचं रहस्‍य… जाणून व्‍हाल थक्‍क | पुढारी

World's Oldest Person : ११८ वर्षांच्‍या सिस्‍टर एंड्रे यांनी सांगितलं त्‍यांच्‍या दीर्घायुष्‍याचं रहस्‍य... जाणून व्‍हाल थक्‍क

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ११८ वर्षांच्‍या फ्रान्‍सिस नन सिस्‍टर एंडे यांनी आपल्‍या दीर्घायुष्‍याचे रहस्‍य सांगितले आहे. नुकतेच सिस्‍टर एंड्रे यांना जगातील सर्वात वयोवृद्ध महिला घोषित केलं आहे. त्‍यांचे वय ११८ वर्ष ७३ दिवस एवढं आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्‍ये त्‍यांच्‍या नावाचा समावेश करण्‍यात आला आहे. ११७ वर्ष पूर्ण केल्‍यानंतर एंड्रे या युरोपमधील सर्वात वयोवृद्ध महिला बनल्‍या आहेत. जपानच्‍या महिला कने तनाका यांच्‍या मृत्‍यूनंतर आता त्‍या जगातील सर्वात वयोवृद्ध महिला आहेत.( World’s Oldest Person)

 पहिले महायुद्ध, स्‍पॅनिश फ्‍लू आणि कोरोनाही पाहिला…

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्‍या माहितीनुसार, सिस्‍टर एंड्रे यांचा जन्‍म ११ फेब्रुवारी १९०४ रोजी झाला. त्‍याचे मूळ नाव लुसिले रँडन नाव होते. नन सिस्‍टर एंड्रे यांनी पहिले महायुद्ध पाहिले. तसेच १९१८ मध्‍ये जगावर आलेले स्‍पॅनिश फ्‍लू संकटाही त्‍या बचावल्‍या. यानंतर २०२० मध्‍ये जगावर आलेले कोरोना संकटावरही त्‍यांनी मात केली. मला कोरोनाची लागण झाल्‍याचे माहितीच नव्‍हते, असे त्‍यांनी एका मुलाखतीत म्‍हटलं आहे.

मागील १२ वर्षांहून अधिक काळ सिस्‍टर एंड्रे या टूलोन येथील एका नर्सिंग हाउसमध्‍ये वास्‍तव्‍यास आहेत. कोरोना
महामारीच्‍या काळात त्‍या एकट्या एका खोलीत राहिल्‍या. आता त्‍यांनी आपल्‍या दिर्घायुष्‍याचे रहस्‍य सांगितले आहे. तसेच त्‍यांनी सांगितले रहस्‍य ऐकुन तुम्‍ही चकितही व्‍हाल.

World’s Oldest Person : दररोज एक ग्‍लास वाईन आणि चॉकलेट

दररोज एक ग्‍लास वाइन आणि चॉकलेट हेच माझ्‍या दिर्घायुष्‍याचं रहस्‍य असल्‍याचे सिस्‍टर एंड्रे यांनी म्‍हटले आहे. विशेष म्‍हणजे, १२२ वर्ष १६४ दिवस आयुष्‍य लाभलेल्‍या जगातील सर्वात दिर्घायुषी महिला जिएन लुइैस कालमेंट यांनीही आपल्‍या दिर्घायुष्‍याचं रहस्‍य हे एक ग्‍लास वाईन असल्‍याचे म्‍हटलं होते. तसेच त्‍यांना चॉकलेटची विशेष आवडत होते. आता मी कालमेंटचे रेकॉर्ड सहज तोडेन, असा विश्‍वास सिस्‍टर एंड्रे व्‍यक्‍त करत आहेत.

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

 

 

 

Back to top button