Instagram : हे फीचर देणार Reels Creaters ला थेट क्रेडिट | पुढारी

Instagram : हे फीचर देणार Reels Creaters ला थेट क्रेडिट

पुढारी ऑनलाईन डेस्क : इन्स्टाग्राम आपल्या क्रीएटर्ससाठी एक नवीन फीचर आणत आहे. ज्यामध्ये इंन्स्टाग्राम क्रीएटर्सना केलेल्या रील शेअर करताना ऑप्शनमध्ये एखादी व्यक्ती, उत्पादन किंवा ब्रँडला Tag @ करता येणार आहे. तसेच निर्मात्याला अधिकचे लाईक्स, viewsसोबत क्रेडिटही मिळणार असून, त्याला याबरोबर आर्थिक फायदाही होणार आहे. यापूर्वी हे फीचर फक्त पोस्टला होते. पण आता Tag @ चे विस्तृत फीचर इन्स्टाग्राम रीललाही (Reel) उपलब्ध असणार आहे, ज्याचे थेट क्रेडिट Instagram Reels Creaters ला मिळणार आहे.

मार्चमध्ये इंस्टाग्राम फीड पोस्टसाठी Tag @ हा पर्याय विस्तृतपणे वापरता येत होता. पण आता ते रीलवर देखील निर्मात्यांना क्रेडिट मिळवून देणारा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. आत्तापर्यंत हे फीचर फक्त इंस्टाग्राम बिझनेस अकाउंटसाठी उपलब्ध होते. पण आता हे पर्सनल अकाउंटसाठीही उपलब्ध होणार आहे. यापूर्वी, निर्मात्याला एखाद्या  गोष्टीचे श्रेय देण्यासाठी युजर्सकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट कींवा फोटोंमध्ये एकमेकांना टॅग करून त्याचा उपयोग करता येत होता. परंतु आता कंपनीच्या मते, रीलमध्ये देखील टॅग करून निर्मात्याला थेट क्रेडिट देता येणार आहे. याच्या माध्यमातून एखादे Instagram Reels कोणी केले, हे समजण्याबरोबरच त्याला यातून आर्थिक फायदाही होणार आहे.

जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट, गीतकार किंवा एखाद्या पोस्टवरील अन्य महत्त्वपूर्ण गोष्टीमध्ये सहभागी असाल तर, Tag @ या पर्यायाच्या सहाय्याने तुमचे योगदान पोस्ट किंवा रीलमध्ये अधिक स्पष्टपणे दिसून येईल असे Instagram ने सांगितले आहे. “योग्य क्रिएटिव्ह क्रेडिट आणि ओळख यामुळे निर्मात्यांना एक नवीन संधी मिळणार आहे. तसेच आर्थिक सक्षमीकरणासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. इंन्स्टाग्राम वर अधिक निर्माते असल्यामुळे यांच्यामध्ये सहयोग निर्माण करता येणार आहे. आतापर्यंत, Instagram समुदाय निर्मात्यांना समर्थन देण्यासाठी एकत्र आला आहे. एकमेकांना क्रेडिट देण्यासाठी Instagram ने नेहमीच पर्यायी मार्ग शोधले आहेत.

रील (Reel) मध्ये Tag @ चे विस्तृत फीचर असे वापरा

  • Instagram अॅप उघडा आणि वरच्या उजव्या कोपऱ्यात (+) टॅप करा.
  • कोणतीही नवीन पोस्ट तयार करा आणि पुढे टॅप (Next) करा.
  • कोणतीही कल्पक संपादन (व्हिडिओ) तयार करा आणि पुढील टॅप (Next) करा
  • मथळा (Title) लिहिल्यानंतर, लोकांना टॅग (@) करा वर टॅप (Next) करा
  • Add Tag निवडा आणि तुमचे Contributors निवडा.
  • Creator category दिसण्यासाठी Profile Category टॅप (Next) करा
  • प्रक्रिया पूर्ण झाल्यावर टॅप (Next) करा.

हेही वाचलत का ?

Back to top button