

'पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील दोन वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जग कोरोना विषाणूविरोधात लढत आहे. आता बहुतांश देशांमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत असताना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ ) दिलेल्या माहितीने मुलांच्या आरोग्याची काळजी वाढली आहे. काही देशांतील लहान मुलांना अज्ञात ' हिपॅटायटीस'च्या लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेसह युरोपमधील ११ देशातील तीव्र ' हिपॅटायटीस'चे १७० रुग्ण आढळले असल्याचे 'डब्ल्यूएचओ'ने म्हटलं आहे.
'डब्ल्यूएचओ'ने दावा केला आहे की, लहान मुलांना अज्ञात ' हिपॅटायटीस'ची लागण झाल्याची १७० केसेस आढळल्या आहेत. यातील एकाचा मृत्यू झाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. अज्ञात ' हिपॅटायटीस'ची लागण झालेल्यांमध्ये १ महिना ते १६ वर्ष वयाेगटातील मुलांचा समावेश आहे. यातील १० टक्के मुलांवर यकृत प्रत्यारोपाची आवश्यकता आहे.
, २१ एप्रिल २०२२ पर्यंत अमेरिकेसह युरोप खंडातील ११ देशांमधील १७० मुलांना अज्ञात तीव्र ' हिपॅटायटीस'ची लागण झाली आहे. युरोपमधील ब्रिटन, उत्तर आर्यलंड, स्पेन, नेदरलँड, इटली, नॉर्वे, फ्रान्स, रोमानिया, इस्त्राईल, बेल्जियम देशांचा समावेश आहे.ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळत आहे. अशातच आता मुलांमध्ये एडेनोविषाणू संसर्गात वाढ झाली आहे. मात्र हा विषाणू ' हिपॅटायटीस'च्या ए, बी, सी, डी आणि ई नाही. तसेच सध्या असणार्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय प्रवास हे याचे कारण नाही. त्यामुळे सध्या तरी प्रवास निर्बंधांची आवश्यकता नसल्याचे 'डब्ल्यूएचओ'ने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :