Tourist visa : चिनी नागरिकांना जारी केलेला पर्यटन व्हिसा अवैध | पुढारी

Tourist visa : चिनी नागरिकांना जारी केलेला पर्यटन व्हिसा अवैध

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : चिनी नागरिकांना जारी करण्यात आलेला पर्यटन व्हिसा (Tourist visa)  यापुढील काळासाठी अवैध ठरविण्यात आला आहे. सुमारे वीस हजार भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परत येऊ देण्यास चीन मज्जाव करीत आहे. चीनच्या या कृतीला सडेतोड उत्तर म्हणून केंद्र सरकारच्या या निर्णयाकडे पाहिले जात आहे. चिनी नागरिकांना जारी करण्यात आलेला पर्यटन व्हिसा यापुढे अवैध असेल, असे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघाकडूनही (आयएटीए) स्पष्ट करण्यात आले आहे.

(Tourist visa)  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हजारो भारतीय विद्यार्थी चीनमधून मायदेशी परतले होते. मात्र, या विद्यार्थ्यांना परत घेण्यास चीनने टाळाटाळ चालविली होती. कोरोनाचे कारण देत व्हिसा देऊ शकत नसल्याचे चीनकडून वारंवार सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे याचवेळी थायलंड, पाकिस्तान, श्रीलंकेच्या विद्यार्थ्यांसाठी चीनने व्हिसा दिला होता. चिनी नागरिकांसाठी पर्यटन व्हिसा देणे भारताने बंद केले असले, तरी व्यापार, रोजगारासह इतर प्रकारचे व्हिसा मात्र, दिले जात आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा मुद्दा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासमोर उपस्थित केला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button