Pakistan | पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात आत्मघाती हल्ला, १६ पाकिस्तानी सैनिक ठार

आत्मघाती हल्ल्यात स्फोटांनी भरलेलं वाहन लष्करी ताफ्यावर धडकवलं
Pakistan
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात आत्मघाती हल्ल्याची घटना घडली आहे.(Source- X)
Published on
Updated on

Attack in Pakistan

पाकिस्तानमध्ये शनिवारी (दि.२८ जून) झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान १६ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. तर अनेक लोक जखमी झाले, असे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने स्थानिक सरकारी अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतात ही घटना घडली आहे.

'या घटनेत एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन सैनिकांच्या ताफ्यावर धडकवले,' असे खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील एका स्थानिक सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. या हल्ल्यात १६ सैनिक ठार झाले आहेत.

Pakistan
Pakistan Rebuilding terror camps | पाकिस्तान पुन्हा उभारतोय ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने उद्धवस्त केलेले दहशतवादी तळ; ISI ची खेळी

हाफिज गुल बहादूर गटाने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

हा स्फोट इतका भीषण होता की दोन घरांचे छप्परही कोसळले. यामुळे ६ मुले जखमी झाली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने एएफपीशी बोलताना सांगितले. दरम्यान, हाफिज गुल बहादूर या सशस्त्र गटाच्या आत्मघातकी बॉम्बर गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा पाकिस्तान तालिबानचा एक गट मानला जातो.

Pakistan
Nicknames of world leaders | डॅडी, विनी द पूह, पुटलर, रॉकेट मॅन... जागतिक नेत्यांची ही टोपण नावे तुम्हाला माहिती आहेत?

अफगाणिस्तानला लागून असलेल्या पाकिस्तानच्या सीमाभागात गेल्या काही दिवसांत हिंसाचारात वाढ झाली आहे. पाकिस्तानने तालिबानवर पाकिस्तानविरुद्ध हल्ला करण्यासाठी त्यांच्या भूमीचा वापर करण्यास परवानगी दिल्याचा आरोप केला आहे. पण हा आरोप तालिबानने फेटाळला आहे.

खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये सरकारविरुद्ध लढणाऱ्या सशस्त्र गटांच्या हल्ल्यात यावर्षी सुमारे २९० जण ठार झाले आहेत. यात बहुतांश सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news