

Nicknames of world leaders Trump, Putin, Xi Jinping, Kim Jong Un, Benjamin Netanyahu, Macron
नवी दिल्ली : जागतिक राजकारणातील शक्तिशाली नेते केवळ त्यांच्या निर्णयांसाठी नव्हे, तर त्यांच्या टोपणनावांमुळेही चर्चेत राहतात. नुकतेच 25-26 जून 2025 रोजी नेदरलँड्सच्या द हेग शहरात झालेल्या नाटो (NATO) शिखर परिषदेत नाटोचे नवे महासचिव आणि नेदरलँड्सचे माजी पंतप्रधान मार्क रूटे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 'डॅडी' असे संबोधित केले.
डॅडी या निकनेमनंतर आता जागतिक नेत्यांना दिली गेलेली टोपणनावे (nicknames) चर्चेत आली आहेत. या विशेष रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत काही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नेत्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरून, कारभारावरून किंवा विरोधकांनी दिलेली गमतीशीर, उपरोधिक आणि काही वेळा वादग्रस्त अशी नावे.
ट्रम्प यांनी इराण-इस्त्रायल संघर्षाचे वर्णन 'दोन शालेय मुलांमधील भांडण' असे केले होते, आणि त्या अनुषंगाने नाटोचे महासचिव रूटे म्हणाले होते की, “...आणि मग डॅडीला कधी कधी थोडं कठोर बोलावं लागतं.”
ही टिप्पणी थट्टेच्या सुरात, म्हणजेच हलक्याफुलक्या शैलीत केली होती. रूटे यांनी नंतर स्पष्ट केले की, त्यांनी थेट ट्रम्प यांना 'डॅडी' संबोधले नाही, तर अमेरिकेचा नाटोमधील प्रभाव दाखवण्यासाठी हा शब्दप्रयोग केला.
दरम्यान, डॅडी संबोधनावर ट्रम्प म्हणाले की, ते फार बोलले. व्हाईट हाउसनेदेखील लगेच "Daddy’s Home" या शीर्षकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. त्यानंतर ट्विटर, इन्स्टाग्राम आणि TikTok वर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडला. नाटो या संघटनेतील अमेरिकेचा प्रभाव पाहता नाटो हे अमेरिकेचे बाळच आहे. त्याअर्थाने ट्रम्प यांना डॅडी म्हटले गेल्याचा अर्थ अनेकांनी लावला होता.
The Donald – ट्रम्प यांना ओळखण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे नाव.
MAGA King – "Make America Great Again" घोषणेवरून समर्थकांमध्ये लोकप्रिय.
Orange Man – त्यांच्या त्वचेच्या रंगावरून विरोधकांनी उपरोधिकपणे वापरलेले नाव.
Teflon Don – कोणतेही वाद अंगाला लागू न देणारा नेता.
Stable Genius – स्वतःच्या ट्विटवरून चर्चेत आलेले उपरोधिक नाव.
Tsar Putin / The Czar – सत्ता केंद्रीकरणावरून मिळालेले नाव. रशियात पुर्वी राजाला झार म्हटले जात होते. त्यावरून हे नाव दिले गेले आहे.
Vova – रशियन भाषेतील स्नेहपूर्वक छोटं नाव.
Putler – पुतीन + हिटलर यांचा वापर करून पुटलर हे नाव विरोधकांकडून वापरले जाते.
The Puppet Master – पाश्चिमात्य राजकीय विश्लेषकांनी पुतिन यांच्यासाठी त्यांच्या गुप्त धोरणांवरून हे नाव वापरले आहे.
Xi Dada – "काका क्षी", चिनी राज्यप्रेमी माध्यमांकडून वापरले जाणारे हे प्रेमळ नाव आहे.
Winnie the Pooh – या नावाच्या कार्टुनवरून हे एक विनोदी नाव जिनपिंग यांना दिले गेले होते. नंतर या नावाने त्यांना बोलविण्यावर चीनमध्ये बंदी घालण्यात आली.
Emperor Xi – आजन्म अध्यक्षपदाच्या दिशेने चाललेल्या धोरणावरून जिनपिंग यांना दिलेले हे उपरोधिक नाव आहे.
Bibi – स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतान्याहू या नावाने ओळखले जातात.
King Bibi – दीर्घकाळ राजकारणात टिकल्यामुळे विरोधकांनी त्यांना हे नाव दिले आहे.
The Magician – सतत सत्तेवर येण्याची क्षमता दाखवल्यामुळे हे नाव त्यांना मिळाले आहे.
Rocket Man – डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांच्यासाठी हे नाव वापरले होते. नंतर ही उपमा आंतरराष्ट्रीय माध्यमांतून प्रचंड गाजली.
The Supreme Leader – उत्तर कोरियामधील अधिकृत पद असल्याने त्यांना उत्तर कोरियात या नावानेही ओळखले जाते.
Lil’ Kim – पाश्चिमात्य प्रसारमाध्यमे किम यांच्यासाठी हे उपरोधिक नाव वापरतात.
Jupiter – राजकीय शैलीशी तुलना करत मॅकॅॉन यांना हे नाव दिले गेले आहे.
President of the Rich – आर्थिक धोरणांवरून विरोधकांनी मॅक्रॉन यांना हे नाव दिले आहे.
Boy President – अत्यंत तरुण वयात अध्यक्षपद मिळाल्यामुळे त्यांना हे नावही मिळाले आहे.
ही टोपणनावे कधी स्नेहपूर्वक, तर कधी टीका करताना वापरण्यात आलेली असली तरी, ती नेत्यांच्या प्रतिमा, धोरणं आणि कार्यशैलीशी जोडलेली असलेली दिसून येतात. 'डॅडी ट्रम्प' हे नाव जसं चर्चेत आलं, तसं इतरही अनेक नेत्यांची टोपणनावं त्यांची जागतिक ओळख ठरलेली आहेत.
जगभरातील सामान्य जनतेपासून ते राजकीय विरोधकांपर्यंत सर्वजण या नावांमधून सत्तेवर असलेल्यांची खिल्ली उडवत राहतात. कधी कधी ही नावे इतिहासातही नोंदली जातात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांना प्रेमापोटी टेडी हे नाव दिले गेले होते. युद्धातील धाडसी भूमिकेसाठी त्यांना The Rough Rider हेही नाव पडले होते.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांना द ब्रिटिश बुलडॉग, विन्नी अशी नावे होती.
जर्मनीचा चॅन्सलर अॅडॉल्फ हिटलर याला द फ्युरर म्हणून ओळखले जात होते. त्याचा अर्थ नेता असा होतो.
फ्रान्सच्या नेपोलियन बोनापार्टला द लिटल कार्पोरल लहान उंचीचा मोठा सेनापती असे संबोधले जात होते.
रशियाच्या जोसेफ स्टालिन याला कठोर शासकीय शैलीसाठी मॅन ऑफ स्टील म्हणून ओळखले जात होते. दुसऱ्या महायुद्धात त्याला अंकल जोई नावानेही ओळखले जात होते.