Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन हल्ल्यातून वाचलेल्या मांजराला घेतलं दत्तक, सोशल मीडियावर युक्रेन सरकारचं होतंय कौतुक

at-survivor of Russia-Ukraine attack adopted
at-survivor of Russia-Ukraine attack adopted
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर आक्रमण करून ४६ दिवस झाले. तरीही हे युद्धाच्या पूर्णविरामाची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. यादरम्यान युक्रेनियन, त्यांचे कुटूंब, प्रियजन, पाळीव प्राणी आणि घरे गमावण्याच्या भयानक गोष्टी इंटरनेट, सोशल मीडियावरून समोर आल्या आहेत. युद्धामधील काही प्राण्यांच्या सुटकेच्या हृदयस्पर्शी कथाही आपण पाहिल्या आहेत. अशीच मानवतेचे दर्शन देणारी आणखी एक घटना समोर आली आहे. युक्रेनमधील बोरोद्यांका शहरात एक मांजर सापडले आहे.

रशियाच्या बॉम्बस्फोट हल्लात युक्रेनमधील बोरोद्यांका शहर बेचिराख झाले आहे. या शहरातील उद्ध्वस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून एका मांजराची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. युक्रेनचे अंतर्गत व्यवहार मंत्र्यांचे सल्लागार अँटोन गेराश्चेन्को यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून या मांजराचे काही फोटो शेअर करत, त्याला दत्तक घेत असल्याचे सांगितले आहे. या इवल्याशा मांजराचा जीव वाचवून त्याला दत्तक घेतल्याबद्दल युक्रेन सरकारचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सल्लागार अँटोन गेराश्चेन्को म्हणतात, मला #Borodianka मधील वाचलेली मांजर आठवते. सध्या ही मांजर अंतर्गत व्यवहार मंत्रालयातच राहते. तिला आम्ही खायला घालतो, आंघोळ घालतो आणि तिच्यावर प्रेमही करतो. आता ती सर्व महत्त्वाच्या मीटिंगदरम्यान  आमच्यासोबत असते.

अँटोन गेराश्चेन्को यांनी शेअर केलेल्या या पोस्टला 32 हजारांहून अधिक नेटिझन्सच्या लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. काहींनी याला दत्तक घेतल्याबद्दल युक्रेन सरकारचे आभार मानले आहेत. तर काहींनी या धक्कादायक परिस्थितीत मांजराच्या शौर्याचे कौतुक केले आहे.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news