zika virus : आता झिका व्हायरस जगभर थैमान घालण्यापासून फक्त एक पाऊल दूर ! | पुढारी

zika virus : आता झिका व्हायरस जगभर थैमान घालण्यापासून फक्त एक पाऊल दूर !

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना मागे पडल्याचे चित्र असतानाच आता झिका व्हायरसने (zika virus) डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. झिका जगाच्या पाठीवर थैमान घालण्यापासून फक्त एक पाऊल दूर असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

झिका व्हायरस जगभरात थैमान घालू शकतो, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. झिका व्हायरसमध्ये फक्त एक म्युटेशन झालं तरी जगात थैमान घालण्यास पुरेसं असल्याचे शास्त्रज्ञांनी दावा केला आहे. (zika virus)

झिका व्हायरसने (zika virus) यापूर्वी २०१६ मध्ये थैमान घातले होते. त्यामुळ जागतिक वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली होती. यामुळे हजारो बालके ब्रेन डॅमेज होऊन जन्माला आली होती. याचे कारण गर्भवती असताना त्यांच्या मातांना झालेली झिका व्हायरसची लागण हे होते. अमेरिकन शास्त्रज्ञांनी जगाने नव्या म्युटेशनकडे लक्ष दिलं पाहिजे असे म्हटले आहे.

जर्नल सेल रिपोर्टमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार व्हायरस नक्की म्युटेशन बदलू शकतो असे म्हटले आहे. बदललेल्या म्युटेशनमुळे व्हायरस पसरू शकतो, ज्यामुळे ज्या देशांनी मागील अनुभव लक्षात घेऊन प्रतीकार शक्ती निर्माण केली आहे त्या ठिकाणी सुद्धा प्रसार होऊ शकतो असेही तज्ञ्जांनी म्हटले आहे.

झिकाची लक्षणे काय असतात ?

अनेकवेळा झिका व्हायरसची (zika virus) लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत, परंतु शरीरातील सुरुवातीची काही चिन्हे पाहून त्यांच्या लागणची अंदाज लावता येतो. झिका व्हायरसमध्ये खूप ताप, पुरळ, सांधेदुखी, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षणे दिसतात. झिका व्हायरसचा संसर्ग खूप गंभीर आहे. जर एखाद्या गर्भवती महिलेला या विषाणूची लागण झाली तर जन्मलेल्या मुलामध्ये मेंदूचे दोष उद्भवू शकतात. याला मायक्रोसेफली असे म्हणतात. यामध्ये नवजात बाळाचा मेंदू आणि डोके सामान्यपेक्षा आकाराने लहान होतात.

हे ही वाचलं का ?

Back to top button