हरभजन सिंह याच्यासह ‘आप’चे ‘हे’ चार सदस्य जाणार राज्यसभेत; एका उमेदवार तर… | पुढारी

हरभजन सिंह याच्यासह 'आप'चे 'हे' चार सदस्य जाणार राज्यसभेत; एका उमेदवार तर...

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधून राज्यसभेच्या ५ जागांच्या नामांकनासाठी सोमवार हा अंतिम दिवस आहे. या जागांवर किक्रेटपटू हरभजन सिंह, पंजाबचे ‘आप’चे प्रभारी राघन चढ्ढा, आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक संदीप पाठक यांची नावे घोषीत करण्यात आली आहेत. पण, यामध्ये आणखी एक नाव समोर आल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती अशोक मित्तल यांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत पंजाबच्या राजकारणात अशोक मित्तल यांचे नाव कुठेच नव्हते.

पंजाब बाहेर काही उमेदवारांची नावे आल्यामुळे पंजाब सरकारवर विरोधी पक्षाकडून निशाणा साधण्यात आला होता. काॅंग्रेस नेते सुखपाल खैरा म्हणाले की, “राज्यसभेचा उमेदवार हा पंजाबच्या बाहेरचा असता कामा नये.” खैरा यांनी काही उमेदवारांच्या नावाची यादी ट्विट करून लिहिले आहे की, “हे उमेदवार असतील, तर पंजाबसाठी ही दुःखाची बाब आहे. हा आपल्या राज्यासाठी पहिला भेदभाव असेल.”

“आम्ही बिगर पंजाबी उमेदवारांचा तीव्र विरोध करू. ही बाब तुमच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांची चेष्टा केल्यासारखे आहे, कारण त्यांना पार्टीसाठी काम केलेले आहे. भगवंत मान यांना माझी विनंती आहे की, बीबी खालरा यांच्यासारखे लोक राज्यसभेचे सदस्य बनवून सन्मान केला जात असेल तर पोलीसही हतबलतेची शिकार झालेली आहे”, असंही सुखपाल खैरा म्हणाले आहेत.

नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला ११७ जागांपैकी ९२ जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे राज्यसभेत रिकाम्या झालेल्या ५ जागांवर आपचे उमेदवारांचा विजय होणं शक्य आहे. नावांच्या घोषणेमुळे आपवर विरोधी पक्ष टीका करत आहेत. पंजाब लोक काॅंग्रेसचे प्रवक्ते प्रितपाल सिंह बलियेवाल यांनी मुख्यमंक्षत्री भगवंत मान यांना सांगितले की, “पंजाबने तुमच्यावर भरोसा दाखवलेला आहे. त्यांंच्या विश्वासावर तुम्हाला खरं उतरावं लागेल.

हे वाचलंत का?

Back to top button