Taslima Nasrin : ‘द काश्मीर फाईल्स’वर तस्लिमा नसरीन म्‍हणाल्‍या, “ही कथा १०० टक्‍के खरी असल्‍यास …. “

Taslima Nasrin : ‘द काश्मीर फाईल्स’वर तस्लिमा नसरीन म्‍हणाल्‍या, “ही कथा १०० टक्‍के खरी असल्‍यास …. “

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सध्‍या विवेक अग्‍निहोत्री यांचा 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातून काश्‍मीर पंडितांवरील झालेल्‍या अन्‍यायाला वाचा फोडण्‍यात आली आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन ( Taslima Nasrin ) यांनीही पाहिला आहे. यावर त्‍यांनी ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

Taslima Nasrin  : काश्‍मीरी पंडितांना त्‍यांचा हक्‍क मिळालाच पाहिजे

तस्लिमा नसरीन यांनी म्‍हटलं आहे की, आज 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट पाहिला. या चित्रपटात दाखविण्‍यात आलेली काहानी १०० टक्‍के खरी असेल तर हे खंरच खूपच वेदनादायी आहे. काश्‍मीरी पंडितांना पुन्‍हा आपल्‍या घरी राहण्‍याचा
हक्‍क मिळालाच पाहिजे. मला हे कळत नाही की, बांगलादेशमधून हिंदूंना विस्‍थापित व्‍हावे लागले यावर कोणीही चित्रपट का करत नाही", असा सवालही त्‍यांनी केला आहे.

'द काश्मीर फाईल्स'ने मोडला बाहुबलीचा रेकॉर्ड

द काश्मीर फाईल्स चित्रपट बॉक्‍स ऑफीसवर जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्‍याच दिवशी ३.५५ कोटी रुपये कमवले. आठ दिवसांमध्‍ये २२ कोटी रुपयांची कमाई करत बाहुबली आणि दंगल या दोन्‍ही चित्रपटांचा रेकॉर्डही तोडला आहे. बाहुबलीने चित्रपट प्रदर्शित झालेल्‍या आठव्‍या दिवशी १९.७५ रुपयांची कमाई केली होती. तर आमीर खानच्‍या दंगलने १८.५९ रुपये कमावले होते.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news