

कीव्ह: पुढारी ऑनलाईन
रशिया-युक्रेन युद्धाचा आज विसावा दिवस आहे. या दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाबाबत अनेकवेळा चर्चाही झाल्या. मात्र याला यश आलेले नाही. चिघळत चालेला हा प्रश्न आता अधिक बिकट होताना दिसत आहे. रशियाकडे आता केवळ १० दिवस पुरेल इतकाचा दारुगाेळा साठा राहिला आहे, असा दावा अमेरिकेच्या एका माजी लष्कर अधिकार्याने केला आहे. दरम्यान. या प्रश्नी आतंरराष्ट्रीय न्यायालय १६ मार्च रोजी निर्णय देण्याची शक्यता आहे. ( Ukraine Russia War )
रशियाची राजधानीमध्ये पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता १७ मार्चपर्यंत राजधानीमध्ये रात्री ८ ते सकाळी सातपर्यंत संचारबंदी असेल. कीव्हचे महापौर विटाली क्लिटस्को यांनी म्हटले आहे की, बॉम्ब हल्ल्यांपासून संरक्षणासाठी नागरिकांना आता बंकरमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
युक्रेनमधील सर्वात मोठे दुसरे शहर खेरसानवर संपूर्ण नियंत्रण मिळवले असल्याचा दावा रशियाच्या सैन्यांनी केला आहे. दरम्यान, या घडामाडीनंतर आता चेक, पोलंड अणि स्लोवेनियाचे पंतप्रधान कीव्ह दौरा करणार आहेत. हे तिन्ही पंतप्रधान युरोपीय संघाचे प्रतिनिधी म्हणून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्याशी चर्चा करणार आहेत.
रशियाने युक्रेनमधील अनेक शहारांमधील हल्ले वाढवले आहेत. युक्रेनही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. युक्रेनच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एक गॅस पाईपलाईनचे नुकसान झाहे.तीन शाळा व एक हॉस्पिटल उद्ध्वस्त झाले आहेत. याहल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दोन हजारांहून अधिक मुलांना युद्धग्रस्त शहरातून बाहेर काढण्यात यश आले असल्याचा दावा युक्रेनच्या सामाजिक नीति मंत्रालयाने म्हटलं आहे. रशियाने युक्रेनवर आतापर्यंत ९०० हून अधिक क्षेपणास्त्र डागली आहेत,. असा दावा अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी केला आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यंचे सहकारी ओलेक्सी एरेस्टोविच यांनी म्हटलं आहे की, " हे युद्ध आता मे महिन्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे, मे महिन्यात दोन्ही देशांमधील शांतता बैठकांना यश येईल, असेही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ते रयिशाचे सैनिकांनी आत्मसमर्पण करावे, असे आवाहन करत आहेत.