Shane Warne : शेन वॉर्न यांच्या पार्थिवावर ३० मार्चला एमसीजीवर होणार अंत्यसंस्कार | पुढारी

Shane Warne : शेन वॉर्न यांच्या पार्थिवावर ३० मार्चला एमसीजीवर होणार अंत्यसंस्कार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचे दिग्गज स्पिनर शेन वॉर्न यांचे गेल्या आठवड्यात थायलंड येथील रिसॉर्टमध्ये निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेन वॉर्न यांचे पार्थिव ऑस्ट्रेलियाला रवाना करण्यात आले आहे. शेन वॉर्न यांच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यू नैसर्गिक असल्याचे म्हटले आहे. (Shane Warne)

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार अंत्यसंस्कार

शेन वॉर्न यांच्यावर ३० मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. १ लाख लोक या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत. तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिस देखील उपस्थित असतील. वॉर्न यांच्या कुटुंबाने म्हटले आहे की पहिल्यांदा आमच्याकडून वयक्तिकरित्या अंत्यसंस्कार करणार आहोत. (Shane Warne)

वॉर्न यांचे मॅनेजर डेनियल ॲड्र्यूज यांनी बुधवारी ट्वीट करत म्हटले आहे की, वार्न यांना अलविदा करण्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच योग्य राहील, याच मैदानावर शेन वॉर्न यांनी १९९४ च्या ॲशेसमध्ये हॅट्रिक घेतली होती. तर शेवटच्या आंतरराष्ट्रीय सीरीजच्या बॉक्सिंग डे टेस्टच्या दरम्यान ७०० वी टेस्ट क्रिेकेट विकेट पटकावली होती. शेन वॉर्न यांचा जन्मही मेलबर्न येथेच झाला होता. (Shane Warne)

शेन वॉर्न टेस्ट क्रिकेटमध्ये ६०० आणि ७०० विकेट्स पटकावणारे जगातील पहिलेच गोलंदाज बनले होते. त्यांनी इंग्लंडच्या विरोधात २००५ मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड टेस्टमध्ये ६०० विकेटचा टप्पा पार केला होता. तर इंग्लंडच्या विरोधातचं मेलबर्नमध्येच वॉर्न यांनी ७०० विकेट्सचा आकडा पार केला होता. श्रीलंकेच्या मुरलीधरनने ८०० विकेट्स पटकावत शेन वॉर्न यांचे हे रेकॉर्ड तोडले होते. (Shane Warne)

Back to top button