‘एक्स-रे’ची सुरुवात कशी झाली?

‘एक्स-रे’ची सुरुवात कशी झाली?

नवी दिल्ली ः  एखाद्या शरीरांतर्गत अवयवाची स्थिती समजून घेण्यासाठी एक्स-रेचा वापर केला जात असतो. त्यामधून विशिष्ट समस्येचे निदान होत असते व उपचाराला दिशा मिळते. मात्र, अशा एक्स-रेच्या वापराची सुरुवात कधी झाली हे तुम्हाला माहिती आहे का?

एक्स-रे म्हणजेच क्ष-किरणांचा शोध बि—टनचे वैज्ञानिक विल्हेल्म रोएंटजेन यांनी सन 1895 मध्ये लावला. मात्र, एक्स-रे मशिनची औपचारिक सुरुवात 18 जानेवारी 1896 मध्ये झाली. एच.एल. स्मिथ यांनी एक्स-रे मशिन सादर केले. क्ष-किरण ही आरोग्य विश्वातील सर्वात मोठी क्रांती ठरली. त्यामुळे रोगाचे अचूक निदान करणे सोपे झाले. विल्हेल्म रोएंटजेन यांच्यामुळेच आज आपण आपल्या शरीरातील अंतर्गत अवयव स्पष्टपणे पाहू शकतो.

कॅथोड रेडिएशनचा प्रयोग करताना विल्हेल्म रोएंटजेन यांनी एक्स-रेचा शोध लावला. ज्यावेळी ते संशोधन करीत होते त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की क्ष-किरण मानवी ऊतींच्या पार जातात आणि त्यामुळे हाडे दिसतात. विल्हेल्म रोएंटजेन यांनी त्यांच्या पत्नी बर्थाच्या हाताचा पहिला

एक्स-रे काढला. एका अहवालानुसार आज जगात दर सेकंदाला शंभरपेक्षा अधिक तर एका वर्षात 4 अब्जपेक्षा अधिक एक्स-रे काढले जातात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news