

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन ( Russian President Putin ) यांना मॉस्कोमध्ये कोणी आव्हान देऊ शकेल का ? गेल्या वर्षी त्यांचे सर्वात मोठे विरोधक आणि टिकाकार अलेक्सी नॅव्हल्नी यांचे काय झाले, त्यावरून रशियात पुतीन यांच्या विरोधात आवाज उठवणे किती कठीण आहे हे दिसून येते. पण काही वर्षांपूर्वी रशियन अध्यक्षीय निवडणुकीत एका पोर्न स्टारने त्यांना आव्हान दिले होते, जी नंतर MMA (मिश्र मार्शल आर्ट्स) मध्ये सामील झाली.
२०१८ च्या रशियन अध्यक्षीय निवडणुकीत पोर्न अभिनेत्री एलेना बर्कोवाने (Elena Berkova) पुतिन यांना ( Russian President Putin ) आव्हान दिले होते. बर्कोवा २००४ पर्यंत अनेक पोर्न व्हिडिओंमध्ये दिसली. या युक्रेनियन-रशियन महिलेने २०१८ च्या निवडणुकीपूर्वी तिचा जाहीरनामा जारी केला, जो खूप लोकप्रिय झाला. यामध्ये तिने लांब स्कर्ट परिधान करणाऱ्या महिलांना गुन्हेगार ठरवण्याचे आणि पुरुषांना त्यांच्या पत्नीला घटस्फोट देण्यास बंदी घालण्यासारखे कायदे आणण्याचे आश्वासन दिले होते.
पॉर्न स्टारला निवडणूक लढवता आली नाही ( Russian President Putin )
मात्र, अध्यक्षीय निवडणुकीसाठी किमान वयोमर्यादा ३५ आणि बेरकोवाचे वय ३२ वर्षे असल्याने ती निवडणूक लढवू शकली नाही. यापूर्वी २००९ मध्येही या अभिनेत्रीने महापौरपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. बर्कोवा अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करीत असते. कधी अॅडल्ट चित्रपट, कधी राजकारण आणि आता मारामारी, बर्कोवा आगामी काळात आणखी कोणत्या क्षेत्रात पाऊल ठेवणार, याची लोक प्रतीक्षा करत आहेत.
कीव-खार्किव मधील क्रॉसची लढाई
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात बुधवारपासून कीव आणि खार्किव या दोन मोठ्या शहरांमध्ये लढाई सुरू झाली आहे. युक्रेनच्या सैन्याने म्हटले आहे की रशियाचे पॅराट्रूपर्स खार्किवमध्ये उतरले आहेत. खार्किव हे युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर आहे. रशियन सैन्याने खार्किवमध्ये आक्रमन करत युक्रेनच्या दुसऱ्या-सर्वात मोठ्या शहरावर हल्ला केला, ज्यात मंगळवारी झालेल्या बॉम्बस्फोटात डझनभर नागरिक मारले गेले.