Nostradamus Russia-Ukraine war : नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीची भिती

Nostradamus Russia-Ukraine war : नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीची भिती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : नॉस्ट्रॅडॅमस (Nostradamus russia – ukraine war) हा एक जगविख्यात भविष्यवेत्ता ज्याच्या गोष्टी जगभरातील साऱ्याच लोकांनी ऐकल्या आणि वावल्या असतील. नेहमी वर्षारंभाच्या आधी किंवा मोठी संकटे येतात तेव्हा सर्वांनाच या नॉस्ट्रॅडॅमसची आठवण येतेच. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नॉस्ट्रॅडॅमसची आठवण लोकांना होऊ लागली आहे. २०२२ या वर्षात युरोपला युद्ध, स्थलांतर, उपासमारी आणि दुष्काळ यासारख्या संकटाचा सामना करावा लागेल, असे भाकीत त्यांनी अनेक वर्षांपूर्वी वर्तवले होते. याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. रशिया-युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीर त्याचे भाकित अनेकांना सत्य वाटू लागले आहे. चला तर जाणून घेऊ या मग नॉस्ट्रॅडॅमसच्या भाकितानुसार या वर्षी काय-काय घडणार आहे?

१५०३ ते १५६६ हा नॉस्ट्रॅडॅमसचा ( Nostradamus russia – ukraine war ) काळ. त्याने १५५५ मध्ये एक पुस्तक लिहले ज्यात पृथ्वीच्या अस्तित्वाबाबत भविष्य वर्तवले आहे. या पुस्तकात एकूण ६३३८ भविष्यवाण्या आहेत. असे म्हटले जाते या भविष्यवाण्याद्वारे त्याने पृथ्वीचे अचूक भाकित केले आहे. अभ्यासकांच्या माहितीनुसार, त्या भविष्यवाण्या जश्याच्या तश्या नाहीत पण, नॉस्ट्रॅडॅमस यांनी त्या वेगळ्या संदर्भात आणि संकेतानुसार विषद केल्या आहेत. अनेकजण त्यांच्या या भविष्यवाण्याचे आजच्या परिस्थितीत अर्थ लावतात आणि या घटनांचे भाकीत त्यांनी आधीच व्यक्त केल्याचा दावा देखील करतात.

युरोपमध्ये युद्ध ( Nostradamus russia – ukraine war )

नॉस्ट्रॅडॅमसच्या अभ्यासकांनुसार त्यांनी रशिया – युक्रेनच्या युद्धाचे भाकित केले होते. या बाबतीत नॉस्ट्रॅडॅमसने २०२२ मध्ये पॅरिसच्या संभाव्य वेढ्याबाबत भाकित केले आहे. ज्याचा अर्थ युरोपमध्ये युद्धाचे संकेत असा घेतला जातो. जर असे असेल तर सध्या युरोप युद्धाला सामोरे जात आहे.

दुष्काळ ( Nostradamus russia – ukraine war )

नॉस्ट्रॅडॅमसने असेही भाकीत केले आहे की, जगातील युद्धे आणि सशस्त्र संघर्ष हे दुष्काळ आणि भूकबळीची समस्या निर्माण करतील ज्यामुळे स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढेल.

निर्वासितांचे स्थलांतर ( Nostradamus russia – ukraine war )

नॉस्ट्रॅडॅमसच्या अभ्यासकांनी असा देखिल दावा केला आहे की, नॉस्ट्रॅडॅमसने २०२२ मध्ये निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे लागतील असे भाकीत केले आहे. तसेच तुलनेने या वर्षात ७ पटीने अधिक स्थलांतराची होईल असे भाकीत केले आहे.

युरोपियन युनियनचे पतन

नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युरोपियन युनियनच्या पतनाविषयीचे भाकीत. याचा असा ही अर्थ लावाला जात आहे की, रशिया युक्रेन हे युद्धा तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरुन अवेघे युरोपच या संकटात सापडणार.

हुकूमशहाचा मृत्यू

काही भविष्यवाण्यांच्या अर्थानुसार, नॉस्ट्रॅडॅमसने हुकूमशहाच्या मृत्यूची भविष्यवाणी केली. अनेकांना वाटते की तो उत्तर कोरियाच्या किम-जोंग उनचा संदर्भ असवा. पण, पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या ही वाटचाली हुकूमशहाकडे चालू आहे मग नेमके कोणत्या हुकूमशहाचा मृत्यू.

जपानमध्ये भूकंपाचा अंदाज

२०२२ सालात जसे युद्धाच्या संकटाचे भाकीत केले गेले आहे तसेच जपानमध्ये मोठ्या आणि विनाशकारी भूकंप होण्याचे भाकीत केले गेले आहे. म्हणजे आणखी काही मोठी संकटे आपली वाट पहात आहेत.

भूतकाळातील 'यशस्वी अंदाज'

नॉस्ट्रॅडॅमसने भूतकाळातील काही ऐतिहासिक घटनांचे अचूक भाकीत केले होते. त्यांनी केलेल्या त्याच्या शब्दांतील काही व्याख्यांवरून असे दिसते. त्यांनी कथितरित्या लंडनची ग्रेट फायर, अॅडॉल्फ हिटलरचा सत्तेचा उदय, द्वितीय विश्वयुद्धाची भीषणता, फ्रेंच राज्यक्रांती आणि अगदी अणुबॉम्बची निर्मिती देखील पाहिली होती. असे भाकित केले गेले होते आणि ही भाकीते खरी ठरली आहेत असे म्हणतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news