russia ukraine crisis : रशिया - युक्रेन युद्धाचे सहा भाषांमध्ये वार्तांकन करणारा पत्रकार | पुढारी

russia ukraine crisis : रशिया - युक्रेन युद्धाचे सहा भाषांमध्ये वार्तांकन करणारा पत्रकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये ( russia ukraine crisis ) सुरू असलेला वाद आता विकोपाला पोहचला आहे. युक्रेनच्या (Ukraine) दोन प्रांतांना रशियाचे राष्ट्रध्यक्ष पुतीन ( Vladimir Putin ) यांनी स्वंतत्र देशाचा दर्जा दिल्यानंतर या निर्णयाने आगीत तेल ओतण्याचेच काम केले आहे. शिवाय या भागाच्या संवरक्षणासाठी रशियन फौजा ( Russian Army ) देखिल रवाना झाल्या आहेत. त्यामुळे युद्धास प्रारंभ झाल्यासारखीच ही स्थिती असल्याचे समजले जात आहे. शिवाय अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्र व संयुक्त राष्ट्र संघाने देखिल रशियाच्या या कृतीचा विरोध केला आहे. त्यामुळे सध्या जगभरातील नेते आणि लोक या संकटाकडे डोळे लावून बसले आहेत, दरम्यान एका पत्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा रिपोर्टर युक्रेनमध्ये आहे आणि तेथून तो रिपोर्टिंग करत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा रिपोर्टर एकटा सहा भाषांमध्ये रिपोर्टिंग करतोय.

या पत्रकाराचे नाव फिलिप क्रॉथर ( philip crowther ) असे आहे. डेली मेलच्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, फिलिप असोसिएटेड प्रेस ग्लोबल मीडिया सर्व्हिसेसशी संबंधित आहे. फिलिप सध्या युक्रेनची राजधानी कीव येथे आहे आणि तेथून इतर अनेक माध्यम सेवांसाठी वार्तांकन करत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिलिप त्याच्या व्हायरल व्हिडिओंमध्ये सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये अस्खलितपणे रिपोर्टिंग करत आहे.

फिलिप क्रॉथर हे इंग्रजी (English), लक्झेंबर्गिश ( Luxembourgish), स्पॅनिश (Spanish), पोर्तुगीज (Portuguese), फ्रेंच (French)आणि जर्मनसह (German) सहा भाषांमध्ये अस्खलितपणे बोलतात. फिलिप यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सोमवारी सहा भाषांमध्ये त्याच्या रिपोर्टिंगचा व्हिडिओ शेअर केला. त्याच्या या व्हिडिओमध्ये तो अनेक न्यूज सर्व्हिसेससाठी रिपोर्टिंग करताना दिसत आहे, जे लोकांना खूपच आवडले आहे.

फिलिप हे कीवमधूनच रशिया-युक्रेन मधील संकटाची माहिती देत ​​आहेत. शिवाय त्याला थेट किंवा सोशल मीडियावर पाहणाऱ्या प्रेक्षकांनी सहा भाषा अस्खलितपणे बोलल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. सध्या जगभरातील लोकांच्या नजरा रशिया-युक्रेनच्या युद्धाकडे लागले आहे, या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा फिलिप क्रॉथरच्या यांनी त्यांच्या अनोख्या वार्तांकनामुळे लोकांना प्रभावित केले आहे.

 

Back to top button