पुढारी ऑनलाईन डेस्क
प्राणीसंग्रहालयातील एका भयानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) झाला आहे. यात एक महिला आपल्या तीन वर्षाच्या मुलीला संरक्षक भिंतीच्या आत पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या अस्वलाजवळ फेकून देते. ही घटना पाहून प्राणीसंग्रहालयात आलेला लोकांना धक्का बसतो आणि ते प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांना तातडीने याची माहिती देतात. त्यानंतर कर्मचारी धाव घेऊन मुलीला वाचवतात.
ही घटना उझबेकिस्तानमधील (Uzbekistan) आहे. प्राणीसंग्रहालयात लोक प्राणी पाहत असताना ही घटना घडली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत (Viral video) एक महिला तिच्या मुलीला पिंजऱ्यातील अस्वलाजवळ फेकून देताना दिसत आहे. या घटनेनंतर प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी अस्वलाला हुसकावून पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजुला नेले आणि मुलीची सुटका केली. मुलीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर महिलेवर मुलीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच तिला अटक करण्यात आली आहे.
जंगली अस्वल हे माणसांसाठी खूप धोकादायक असते. इतर जंगली प्राण्यांपेक्षा अस्वल हे माणसांवर कधी हल्ला करेल हे सांगता येत नाही.