कोरोनाचा ‘नियोकोव’ व्हेरियंट वेगाने पसरणार, तीनपैकी एक जण दगावेल, भयावह भाकीत

कोरोनाचा ‘नियोकोव’ व्हेरियंट वेगाने पसरणार, तीनपैकी एक जण दगावेल, भयावह भाकीत
Published on: 
Updated on: 

केपटाऊन : वृत्तसंस्था

ओमायक्रॉननंतर कोरोनाच्या 'नियोकोव' या नव्या व्हेरियंटने जगभरावर दहशतीचे सावट पसरले आहे. दक्षिण आफ्रिकेत हा व्हेरियंट आढळून आला असून, चीनमधील वुहान येथील वैज्ञानिकांनी या व्हेरियंटसंदर्भात मोठा दावा केला आहे. नियोकोव व्हेरियंटचा प्रादुर्भावही वेगात होईल आणि यामुळे मृत्यूही मोठ्या प्रमाणावर होतील. व्हेरियंटची लागण झालेल्या तीनपैकी एक जण दगावेल, असे भयावह भाकीत वुहानमधील वैज्ञानिकांनी याबाबत वर्तवले आहे.

सुदैवाने सध्या हा व्हेरियंट कुठल्याही माणसामध्ये नव्हे, तर वटवाघळामध्ये आढळलेला आहे. वुहान तेच शहर आहे, जेथून 2020 मध्ये कोरोना महामारीचा उद्भव झाला होता, हे येथे उल्लेखनीय! रशियातील स्पुत्निक वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हेरियंट अगदी नवा कोरा नाही. हा कोरोनाच्या 'मर्स कोव' विषाणूशी संबंधित आहे. सर्वांत आधी मर्स कोवचे रुग्ण 2012 आणि 2015 मध्ये पश्चिम आशियातील देशांतून आढळले होते. तेव्हाही हा व्हेरियंट जनावरांमध्येच आढळला होता. दक्षिण आफ्रिकेत हा नियोकोव व्हेरियंट आता वटवाघळात आढळला आहे.

'बायोआरक्सिव' (लळेठुर्ळीं) संकेतस्थळावर प्रकाशित संशोधनानुसार, नियोकोव आणि त्याचा सहकारी विषाणू पीडीएफ-2180-कोव्ह यांची माणसांना लागण होऊ शकते. वुहान विद्यापीठ आणि 'चायना अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस'च्या संशोधकांच्या मते, या माणसांच्या पेशी संक्रमित करण्याची क्षमता अर्जित करण्यासाठी या नव्या कोरोना विषाणूत केवळ एका म्युटेशनची (एका बदलाची) आवश्यकता आहे. रशियातील 'व्हायरोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी' विभागाचे मत मात्र वेगळे आहे. या व्हेरियंटस्ची माणसात संक्रमणाची शक्यता तूर्त अगदीच कमी आहे. या व्हेरियंटची क्षमता आणि जोखीम दोन्हींसंदर्भात आम्ही आणखी संशोधन करायला हवे, असे रशियातील या विभागाचे म्हणणे आहे.

सब-स्ट्रेन 'बीए-2'चा धाक

ओमायक्रॉनचा सब-स्ट्रेन 'बीए-2'नेही जगाची झोप उडविली आहे. आरटी-पीसीआर चाचणीतही तो आढळत नसल्याने ही स्थिती आहे. बीए-2 भारतासह 40 देशांतून आढळला असून, उर्वरित जगातही तो वेगाने पसरण्याची शक्यता आहे.

  • ..तर नव्या कोरोना व्हेरियंटमुळे दररोज बाधित 3 पैकी होणार एकाचा मृत्यू
  • वुहानमधील शास्त्रज्ञांचा दावा
  • जगभरावर दहशतीचे सावट
  • सध्या मानवात प्रादुर्भाव नाही
  • रशियातील तज्ज्ञ म्हणतात, तूर्त धोका नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news