US Vs China : अमेरिकेने लक्ष घालू नये, भारत-चीन सीमावादावर चीनचे भाष्य | पुढारी

US Vs China : अमेरिकेने लक्ष घालू नये, भारत-चीन सीमावादावर चीनचे भाष्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतासोबत असणाऱ्या सीमावादावरून चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे की, “अमेरिकेने (US Vs China) यामध्ये दखल देऊ नये. आम्ही दोन्ही देश सामोपचाराने हे प्रकरण मिटवू.” लडाख क्षेत्रात चीनकडून मनमानी पद्धतीने जे अतिक्रमण आणि कुरघोड्या केल्या जात आहे, त्यावर भारताने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. चीनने शेजारील राष्ट्रांवरही विस्तारवादी भूमिकेतून कुरघोड्या केलेल्या असल्यामुळे अमेरिका आणि इतर पश्चिमेकडील देशांकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे चीनवर दबाव येत आहे.

चीनने म्हटलं आहे की, “भारताचीदेखील ही इच्छा आहे की, चीन आणि भारत यांच्यातील सीमावादावर तिसऱ्या पक्षाने मध्यस्ती करू नये.” पण, चीनच्या या म्हणण्यावर भारताने अजुनही काही प्रतिक्रिया दिलेली नाही. चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणं आहे की, हा सीमावाद दोन देशांतील वाद आहे. त्यामुळे अमेरिकेने त्यांवर टीका केली. त्यांनी म्हटलं आहे की, चीन हा भारतासहीत इतर शेजारील राष्ट्रांना विवश करत आहे.

चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता वू कियान यांनी म्हटलेलं आहे की, “काही अमेरिकन विश्लेषकांकडून ‘दमन’ हा शब्द वापरला जात आहे. पण, ते विसरत आहे की, अमेरिकाच ‘दबाव धोरणा’चा अविष्कारकर्ता आहे. तीन हा कुणावर दबाव टाकत नाही किंवा कुणाचा दबाव सहन करत नाही. चीन अमेरिकेच्या दबावाला जुमानत नाही. आम्ही भारतासोबत सामोपचाराने चर्चा करून सीमावादाचा प्रश्न सोडवू”, असे मत कियान यांनी सांगितले. (US Vs China)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जपानचे पंतप्रधान किशिंदा यांच्यासोबत ८० मिनिटांची जी व्हर्च्युअल बैठक घेतली होती, त्यामध्ये चीनला इशारा दिला होता. चीन समुद्रात वाढतं अतिक्रमण, भारत-प्रशांत महासागरात वाढतं अतिक्रमण आणि युक्रेन संघर्षादरम्यान ताईवानमध्ये आक्रमण न करण्यावरून चीन अमेरिकेला धमकावले. “चीनने आपल्या कुरघोड्या बंद कराव्यात. भारतीय सीमेवर चीनच्या सतत चाललेल्या कुरघोड्यांवर अमेरिकेची नजर आहे.”

कियान यांनी पूर्व लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) वर चाललेल्या सीमावादावरून भारत आणि चीन यांच्यात १२ जानेवारीला १४ बैठकीत व्हाईट हाऊस प्रेसचे सचिव साकी यांच्याकडून करण्यात आलेल्या वक्तव्याचा दाखला अमेरिकेवर भाष्य केले. साकी म्हणाले होते की, “पूर्व लडाख आणि जगभरात बिजिंग करत असलेल्या व्यवहारावर नजर ठेवून आहोत. आम्हाला विश्वास आहे की, अस्थिर करण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहे. शेजारील राष्ट्रांना चीन ज्या पद्धतीने धमकाविण्याचा किंवा घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे, तो चिंताजनक आहे.

Back to top button