

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कॉग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चिंतन बैठक गुरुवारी वांद्रे येथील एमसीए क्लब येथे झाली. त्यामध्ये निवडणुकांचे निकाल व आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा होऊन यापुढेही राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढवावी, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
ही बैठक प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी बोलवली होती. वांद्रे येथील एमसीए क्लब येथे झालेल्या या बैठकीस विधिमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित होते.