व्हीआयपींसाठी सेलिब्रेटीकडून अडल्ट पार्टी, सेक्स वर्कर्सची डॉक्टर करत होते तपासणी ! | पुढारी

व्हीआयपींसाठी सेलिब्रेटीकडून अडल्ट पार्टी, सेक्स वर्कर्सची डॉक्टर करत होते तपासणी !

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिध्द अडल्ट मॅगझिन playboy चे संस्थापक ह्यू हेफनर आपल्या लाईफ स्टाईलमुळे नेहमी वादात सापडले. आता एका नव्या डॉक्युमेंटरीमध्ये काही महिलांनी ह्यू हेफनर यांच्यावर सेक्ससाठी जबरदस्ती करणे तसेच ड्रग्ज देणे असे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर आता प्लेबॉय कंपनीकडून निवेदन आले आहे.

प्लेबॉय ने सांगितले की, “घृणास्पद कृत्यांचे आरोप” घेऊन पुढे आलेल्या महिलांचे ते समर्थन करत असल्याचे म्हटले आहे. हेफनर यांचे २०१७ मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.

Secrets of Playboy डॉक्यूमेंटरी सीरीज मध्ये हेफनर यांच्यावर प्लेबॉय हवेली आणि नाईट क्लबमध्ये महिलांना सेक्ससाठी जबरदस्ती करणे आणि ड्रग्ज देणे या सारखे आरोप केले आहेत. हेफनर यांच्या पूर्व गर्लफ्रेंडने हेफनर यांना ‘पिशाच’ च्या रुपाने वर्णन केले आहे.
ह्यू हेफनर याच्यावर काय काय आरोप आहेत?

हेफनरला आठ वर्षे डेट करणारी अमेरिकन मॉडेल हॉली मॅडिसन हिने म्हटले आहे की, तिला दारूचे व्यसन लागले होते. एकदा तर जीव देण्याचा विचारही तिच्या मनात आला होता. हेफनरने “ब्रेनवॉश” केले आणि तिला नियंत्रित केले. मॅन्शनमधून पळून जाण्याच्या विचाराने ती घाबरली. होली मॅडिसनने असेही सांगितले की, तिला न सांगता तिच्या सेक्स टेप्सही बनवल्या गेल्या. (playboy)

हेफनरच्या महालामध्ये प्रत्येक गुरुवारी “Pig Night” नावाची सेक्स पार्टी होत होती. ही पार्टी हेफनर आपल्या व्हिआयपी मित्रांसाठी आयोजित करायचा. यावेळी सेक्स वर्कर्सला बोलावण्यात यायचे, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जायची.

१९७० आणि ८० च्या दशकात हेफनरला डेट करणारी एक पूर्व मॉडेल आणि अभिनेत्री सॉन्ड्रा थिओडोर म्हणाली, “मी एकामागून अनेक मुली पाहिल्या. प्रत्येक वेळी नवीन चेहरा, मोहक, सुंदर. आम्ही त्या मुलींसमोर काहीच नव्हतो. असही तिने म्हटलं आहे.

हेफनरच्या बंगल्यात ग्रुप सेक्स इव्हेंट आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये ड्रग्ज दिले जात होते, असा दावा सोंड्राने केला होता. आठवड्यातून पाच दिवस हे काम चालायचे. हेफनरने स्वतःसाठी एक खास प्लेबॉय मॅन्शन बांधली, ज्यामध्ये तो अनेक मुलींसोबत राहत होता. हेफनरचे अनेकांशी शारीरिक संबंध होते. (playboy)

महिलांच्या आरोपांवर कंपनीने अस म्हटलं की, “आम्ही महिलांवर आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. जे त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी पुढे आले आहेत त्यांना आम्ही पाठिंबा देतो.”

ह्यू हेफनर यांनी १९५३ मध्ये प्लेबॉयची स्थापना केली होती. लवकरच ते जगातील सर्वाधिक विकले जाणारे प्रौढ मासिक बनले. एकदा, फक्त एका महिन्यात सात लाख प्रती विकल्या. २०१७ मध्ये हेफनरच्या मृत्यूनंतर, कंपनीने मासिकाची छपाई बंद केली. (playboy)

हेही वाचलत का?

Back to top button