Goa Election 2022 : भाजपची दुसरी यादी जाहीर; श्रीपाद नाईक यांच्या मुलाला तिकीट नाकारलं! | पुढारी

Goa Election 2022 : भाजपची दुसरी यादी जाहीर; श्रीपाद नाईक यांच्या मुलाला तिकीट नाकारलं!

पणजी; पुढारी वृत्तसेवा : भाजपने (Goa Election 2022) उर्वरित सहा मतदारसंघातील उमेदवार यादी जाहीर केले आहेत. यामध्ये कुंभारजुवे मतदारसंघातून जनिता पांडुरंग मडकईकर यांना उमेदवारी दिली आहे. त्या विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या पत्नी आहेत.

कुंभारजुवे मतदारसंघातून (Goa Election 2022) उमेदवारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक प्रयत्नरत होते. मात्र, भाजपने मडकईकर यांच्या पत्नीला उमेदवारी देणे पसंत केले आहे. सिद्धेश यांच्या उमेदवारीसाठी श्रीपाद यांनी दिल्लीत प्रयत्न करूनही पक्षाने त्यांची मागणी मान्य केलेली नाही.

Koo App

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सुरुवातीला सांताक्रुझ मतदारसंघातून आग्नेल डिकुन्हा यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. त्यांच्या नावावर भाजप राजी होत नसल्याने पुन्हा सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस यांनाच उमेदवारी द्यावी, असा बाबुशनी प्रस्ताव दिला. तो मान्य करण्यात आला आहे. तेथून निवडणूक लढवण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे हेही प्रयत्नशील होते.

डिचोली मतदारसंघातून राजेश पाटणेकर, कुठ्ठाळी मतदारसंघातून नारायण नाईक, कुडतरी मतदार संघातून अँथनी बार्बोझा आणि कळंगुट मतदारसंघात जोसेफ सिक्वेरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Back to top button