International Yoga Day 2023 | नाशिकमध्ये ५ हजार फॉरेनर्सनी योगशास्त्र शिकून परदेशात सुरू केले योगा स्टुडिओ

International Yoga Day 2023 | नाशिकमध्ये ५ हजार फॉरेनर्सनी योगशास्त्र शिकून परदेशात सुरू केले योगा स्टुडिओ
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; योगशास्त्राकडे केवळ आरोग्याच्या दृष्टीने न बघता आता करिअर म्हणून बघितले जात आहे. त्र्यंबकेश्वरमधील योग विद्या गुरुकुलमध्ये २०१० पासून परदेशी नागरिकांसाठी योगशास्त्राचे शिक्षण सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत तिथे ५ हजार परदेशी नागरिकांनी योगशास्त्राचे अधिकृत शिक्षण घेतले असून, त्यांनी परदेशात जाऊन स्वत:चे योगा स्टुडिओ सुरू केले आहेत. भारताच्या तुलनेने परदेशात योगाची क्रेझ वाढत असल्याने शिवाय पैसाही मुबलक मिळत असल्याने योगशास्त्राच्या जोरावर त्यांनी स्वत:चे यशस्वी करिअर उभे केले आहे. (International Yoga Day 2023)

माणसाच्या मूलभूत गरजांपैकी काळानुरूप योगशास्त्राचे महत्त्व आता वाढले आहे. करिअर म्हणून योगशास्त्राकडे बघितले जात आहे. काही दुर्धर आजार जे तज्ज्ञ डॉक्टरांकडून बरे होऊ शकत नाही ते योगशास्त्राने बरे झाल्याची अनेक उदाहरणे आजवर घडली आहेत. त्यामुळे योगशास्त्राच्या वाटा करिअर म्हणून खुल्या झाल्या आहेत. १९८३ मध्ये त्र्यंबकेश्वरमधील तळवाडे येथे योग विद्या गुरुकुलची स्थापना झाली. या महाविद्यालयाला केंद्र सरकारच्या आयुष केंद्रीय मंत्रालय विभागाची मान्यता मिळाली आहे. कवी गुरुकुल कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, नागपूरद्वारे एमओयू अंतर्गत योग विद्या जोडले गेले आहे. या महाविद्यालयातून आतापर्यंत भारतातून १६ हजार तर नाशिकमधून २,५०० विद्यार्थ्यांनी योगशास्त्राचे अधिकृत शिक्षण घेतले असून, उत्तमरीत्या स्वत:चे करिअर सुरू आहे. (International Day of Yoga 21 June 2023)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात २००६ पासून योग अभ्यासक्रम सुरू असून, आजवर मुक्त विद्यापीठाच्या योगविषयक शिक्षणक्रमातून १५ हजार योगशिक्षक तयार झाले आहेत. राज्यभरातून मुक्त विद्यापीठाच्या ६० अभ्यासकेंद्रांमार्फत हा शिक्षणक्रम चालवला जातो. या शिक्षणक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मुक्त विद्यापीठाच्या आरोग्य शिक्षण शाखेचे संचालक तथा विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. जयदीप निकम यांनी दिली. (International Day of Yoga 2023)

कोणती पदवी घेता येते?

डिप्लोमा इन योगशास्त्र (१ वर्ष)- पात्रता बारावी उत्तीर्ण

बॅचलर इन योगशास्त्र (३ वर्ष)- पात्रता बारावी उत्तीर्ण

मास्टर इन योगशास्त्र (२ वर्ष)- कोणत्याही शाखेचा पदवीधर

योगशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळते. शिवाय स्वत:चे योगा सेंटर सुरू करता येते आणि पगारही चांगला मिळतो. त्यामुळे योगशास्त्राचे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

-विश्वास मंडलिक, योगाचार्य, योगविद्या गुरुकुल

मुलीच्या जन्मानंतर सर्व उपचार केल्यानंतर पण पाठदुखीचा त्रास सुरूच राहिला. योगशास्त्रात डिप्लोमा केल्यानंतर नियमित योगाला सुरुवात केल्यावर सहा महिन्यांत पाठदुखीचा त्रास बंद झाला. त्यानंतर मी योगाच्या ऑनलाईन व ऑफलाइन बॅचेस सुरू केल्या. योगामुळे लोकांची दुखणी बंद होतात याचा अनुभव अधिक सुखद वाटतो.

-चारुशीला गोरवाडकर

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news