

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जागतिक भूक निर्देशांक अर्थात ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 (Global Hunger Index) मध्ये भारताची 4 अंकांनी घसरण झाली आहे. 125 देशांच्या यादीत भारत 107 व्या क्रमांकावरून 111 व्या स्थानी पोहोचला आहे. भारतातील कुपोषण, उपासमार, गरिबी, बेरोजगारी हे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. भारताने या निर्देशांकासाठी आवश्यक आकडेवारीमध्ये 28.7 मानांकन मिळवले असून, त्याआधारे भारतात उपासमारीची भीषण स्थिती असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. मात्र, एकीकडे जागतिक पातळीवर हा निर्देशांक काढला जात असताना, दुसरीकडे भारताने मात्र या निर्देशांकातील आकडे चुकीचे असल्याचे सांगत ते फेटाळले आहेत.
संबंधित बातम्या :
या निर्देशांकानुसार, भारताची पाकिस्तानच्याही खाली घसरण झाली आहे. यादीनुसार, पाकिस्तान 102 व्या स्थानी, बांगला देश 81 व्या स्थानी, तर नेपाळ 69 व्या स्थानी आहे. एकीकडे आशिया खंडातील आपल्या शेजारी राष्ट्रांच्या तुलनेत भारताचे स्थान बरेच खाली घसरले असताना, दुसरीकडे दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील देशांपेक्षा भारताचे मानांकन चांगले असल्याचेही यादीतून स्पष्ट झाले आहे. या देशांना सरासरी प्रत्येकी 27 इतके मानांकन मिळाले आहे.
जागतिक उपासमार निर्देशांकातून भारतातील कुपोषणाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असताना, दुसरीकडे भारताने ही आकडेवारी चुकीची असल्याचे सांगून फेटाळली आहे. हे निर्देशांक ठरवताना चुकीच्या पद्धतीचा वापर करण्यात आल्याची भूमिका केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाने घेतली आहे. हा निर्देशांक ठरवताना उपासमारीच्या मोजमापाची चुकीची पद्धत वापरण्यात आली. पद्धतीसंदर्भातल्या गंभीर चुका यात आहेत. निर्देशांकासाठी ठरवण्यात आलेले चारपैकी तीन निकष गे मुलांच्या आरोग्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ते संपूर्ण लोकसंख्येचे निदर्शक ठरू शकत नाहीत. कुपोषित लोकसंख्येचे प्रमाण या चौथ्या निकषासाठी फक्त एक ओपिनियन पोल ग्राह्य धरण्यात आला आहे.
हेही वाचा :