

महाड; पुढारी वृत्तसेवा : Vulture : भारतीय वन्य जीवनमधील झपाट्याने धोक्यात आलेल्या संकटग्रस्त प्रजातींमध्ये प्रथम क्रमांकावर पांढऱ्या पाठीचे आणि लांबचोचिचे गिधाड अशा दोन प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे. तर उरलेल्या प्रजातींपैकी (स्लेंडर बिल्ड) गोलाकार चोचीचे गिधाड, राजगिधाड, आणि दाढीवाले हिमालयीन गिधाड यांचा देखील नुकताच समावेश करण्यात आला. ही गंभीर बाब आहे. (Vulture)
भारतातील अनेक राज्यातून या प्रजाती कायमस्वरूपी विलुप्त झाल्या आहेत. तर, ज्या राज्यांमध्ये गिधाड पूर्णवेळ व हंगामी दिसतात त्यांचा अभ्यास दौरा गेल्या जानेवारी महिन्यात सिस्केप सोसायटी ऑफ इको इंडेजर स्पीसीज कंजर्वेशन अँड प्रोटेक्शन महाड या संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मिस्त्री (मानद वन्यजीव रक्षक रायगड जिल्हा ) यांनी नुकताच त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत पूर्ण केला. (Vulture)
या सर्वेक्षणाचे निमित्त होते कार्डियन बारतोझुक या शास्त्रज्ञ (अँकविला कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकारी) यांच्यासोबतच्या गिधाड स्थलांतराचे मार्ग याविषयीच्या शास्त्रीय संशोधन मोहिमेबद्दल… कार्डियनसोबत आणि रशियातील सायबोको सेंटर फॉर ऑर्नी थॉलॉजिकल स्टडी अँड रिसर्च सेंटरचे संचालक इगोर आणि प्रकल्प अधिकारी ईलवीरा निकोलिंका यांच्या रशियन रेपटर्स रिसर्च इक्विडीशन या मोहिमेत भारतातून प्रेमसागर मिस्त्री यांनी सहभाग घेतला होता.
या सर्वेक्षण संशोधन मोहिमेत अल्ताई पर्वतमाला आणि तुंबा वाळवंटी प्रदेशातील सिनेरिअस गिधाडांवर तसेच स्टेपी गरुड या प्रजातीवर रेडिओ टेलीमेट्री हे दृश्य माहिती देणारे यंत्र बसविण्यात आले. तर, कजाकिस्तानमध्ये उत्तर भागात इजिप्तिशियन गिधाडांवर जीपीएस लोकेशन टेलिमेंटरी डिव्हाईस यंत्र बसविण्यात आले.
Vulture : गिधाडांच्या स्थलांतरचा मार्ग शोधणे सुरू
या पक्षांचा स्थलांतर मार्ग तसेच भारतातील त्यांची काही काळ थांब्याची ठिकाणी शोधणे सोपे जावे व त्यांच्या मार्गातील अडथळे शोधून त्यावर उपाय सुचविणे अशा व इतर कारण मीमावसा करिता वरील मोहिमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यासंदर्भात गिधाडांच्या स्थलांतराबाबत अधिक माहिती देताना प्रेम सागर मिस्त्री यांनी स्पष्ट केले की, साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात स्थलांतराचे विविध मार्ग लक्षात आले असून या पक्षांच्या जीपीएस हालचालीवरून त्यांची स्थिती शोधणे तसेच निश्चित करणे सुरू झाले आहे.
भारतात पूर्वेकडील थायलंड, म्यानमार, बांगलादेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, असा मार्ग तर ते तिबेट, उत्तर प्रदेश, हरिद्वार हा मार्ग तर भारत-पाक सीमेवरील काही खिंडीचे सखल मार्ग अशा मार्गांचा अवलंब हे पक्षी भारतात येण्यासाठी करतात हे निदर्शनास आले. परंतु, सर्व पक्षांची भारतात पोचल्याची ठिकाणी निश्चित होती. ती म्हणजे हिमालयाच्या सखलरांगा आणि तेथील मोठी विकसित शहरांची डम्पिंग ग्राउंड्सच्या ठिकाणी मोठ्या कचऱ्याच्या ढिगाराची ठिकाणी दिसून आली आहेत.
तेथून थंडी जशी अधिक वाढेल तशी ही गिधाडे राजस्थान, गुजरातकडे स्थलांतरित होतात. जैसलमेर-रामगड रस्ता, जैसलमेर डम्पिंग राऊंड, झुनझुन, बिकानेर, जोधपुर डम्पिंग ग्राउंड, तसेच जोरबीर गिधाड संवर्धन संरक्षित जागा आहे. येथे हजारोंच्या संख्येने हिमालयीन ग्रीफन, युरेशियन ग्रीफन, इजिप्तशियन व्हल्चर्स, सीनेरीयस गिधाडे आधी अनेक गिधाड प्रजातींसोबत युरोपीय गरुड, ससाणे यांच्या अनेक प्रजाती येथे परिसरात पहायला मिळतात .
यापैकी कार्डियनने निश्चित टॅग केलेली चार इजिप्टिशियन गिधाडे व इगोर एलोवेरा प्रेमसागर मिस्त्री यांच्या टीमने रशिया मध्ये रिंग केलेले सेनेरियस गिधाड स्टेपी गरुड यांना शोधण्यात या पथकाला यश आले आहे. यंदादेखील ही गिधाडे फार मोठ्या संख्येने भारतात स्थलांतरित होत आहेत.
आजच्या दोन सप्टेंबर या जागतिक गिधाड संवर्धन जनजागृती दिनानिमित्त गिधाड संरक्षित थांब्यांचे संवर्धन व्हावे आणि फीडिंग ग्राउंड विकसित करून योग्य त्या शास्त्रीय पद्धतीने राबविली जावी अशी आशा प्रेम सागर मिस्त्री यांनी व्यक्त केली.
गाईगुरांच्या पोटातील प्लास्टिकचा कचरा, विषबाधा, धातुके आणि अशुद्ध पाणी इलेक्ट्रिक शॉक मृत्यू या मूळ समस्येवर लक्ष केंद्रित करून गिधाडांची स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कशी जास्तीत जास्त वाचवता येईल यावर संस्था लक्ष केंद्रित करीत असून ही या निमित्ताने काळाची गरज बनल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सर्व संशोधन संवर्धन चळवळीचे मूळ रायगड जिल्ह्यातील मुसळा येथील शिरगाव फापट श्रीवर्धन या परिसरात 2000 मध्ये आढळून आले. सन 1998 साली गिधाडांच्या संख्येत भारतात झालेली प्रचंड घट जाहीर झाली होती. आणि या निमित्ताने गिधाडांच्या वास्तव्याचा शोध सुरू झाला. अवघ्या 28 गिधाडांच्या संख्येवरून आजमीतिला 350 गिधाडे वाढविण्यात सिस्केप संस्था परिसरातील सर्व गावांतील ग्रामस्थ देवराई म्हसळा श्रीवर्धन महाड माणगाव रोहा वनविभाग आदी अनेकांच्या एकत्रित प्रयत्नाने हा नैसर्गिक वाढीचा व संवर्धनाचा रायगड जिल्हा पॅटर्न यशस्वी झाला आहे.
याची नोंद महाविद्यालयीन पाठ्यपुस्तक मंडळांनी तसेच दिल्ली येथील 'चिल्ड्रन्स इन सायक्लोपीडिया 'या पुस्तकांनी घेतल्याने त्याचा आदर्श येणाऱ्या पुढील पिढ्या अभ्यासतील यामध्ये शंका नसल्याचा विश्वास श्री प्रेमसागर यांनी बोलून दाखविला.
चिरगाव येथील किशोर घुलेघुले भापट येथील श्री शिंदे तर चांदोरे येथील माजी सभापती सुजित शिंदे यांच्या प्रमुख सहकार्यातून तसेच सर्व गावातील ग्रामस्थांच्या सक्रिय योगदानातून म्हसळा श्रीवर्धन परिसरातील गिधाड प्रकल्प योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याचा अभिप्राय प्रेम सागर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केला.
हेही वाचा: