भारतातील प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. आर. रवी कन्नन यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर | R Ravi Kannan wins Ramon Magsaysay | पुढारी

भारतातील प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. आर. रवी कन्नन यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर | R Ravi Kannan wins Ramon Magsaysay

लोककेंद्री आणि गरिबांसाठी केलेल्या कार्याची दखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसाममध्ये कॅन्सर उपचारांत क्रांती घडवणारे डॉक्टर आर. रवी कन्नन यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. कन्नन हे मुळचे चेन्नईचे आहेत, त्यांनी आसाममध्ये कॅन्सर उपचारात फार मोठे कार्य उभे केले आहे. मॅगसेसे पुरस्कार हा आशियातील नोबेल पुरस्कार मानला जातो. या पुरस्काराच्या ‘हिरो फॉर होलिस्टिक हेल्थकेयर’ या श्रेणीसाठी रवी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

कन्नन यांनी सुरुवातीला कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ चेन्नईमध्ये काम केले त्यानंतर ते आसाममधील Cachar Cancer Hospitalमध्ये २००७पासून रुजू झाले. कन्नन यांच्या नेतृत्वाखाली हे हॉस्पिटल सुसज्ज बनले. त्यांनी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार, दूर वरून येणाऱ्या रुग्णांसाठी राहाण्याची आणि सेवेची सुविधा, घरातून सुश्रुषा असे बरेच उपक्रम सुरू केले.

कन्नन यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे.

रॅमन मॅगसेसे अवार्डीज फाऊंडेशनने म्हटले आहे, “लोकसेवेसाठी त्यांनी जे योगदान दिले आहे, त्याची आम्ही दखल घेतो. लोककेंद्री, गरिबांच्यासाठी कॅन्सर उपचार सुरू करताना त्यांनी कोणतीही अपेक्षा ठेवली नव्हती. आसाममधील लाखो लोकांसाठी ते आशेचा किरण बनले आहेत. ”

कोण आहेत डॉ. रवी कन्नन 

आसाममधील Cachar Cancer Center मध्ये कार्यरत असलेले रवी यांचा जीवनपट प्रेरणा घ्यावी असाच आहे. रवी यांच्या आईने त्यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. पण परिस्थितीमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. अशा वेळी त्यांनी आपल्या मुलाला डॉक्टर करण्याचे स्वप्न पाहिले. आईचे हेच स्वप्न पूर्ण करत रवी यांनी उत्तर पूर्वेकडील कॅन्सर पेशंटसाठी महत्त्वाची भूमिका बजावली .

कन्नन यांनी करियरची सुरुवात चेन्नईमधील अडयार कॅन्सर सेंटरपासून केली. २००७ ला ते पत्नीसोबत सिलचर, आसाम येथे  स्थायिक झाले. तेव्हापासून ते Cachar Cancer Center या ठिकाणी कार्यरत आहेत. गरिबांना मोफत उपचार देणे, तसेच कॅन्सर पेशंटच्या उपचारांचा खर्च जास्तीत जास्त आवाक्यात येईल हे यासाठी प्रयत्न करणे या गोष्टींचा समावेश होतो.  ते आसाम राज्याच्या अतिदुर्गम क्षेत्रातही काम करण्याची मनीषा बाळगून आहेत.

या भारतीयांना मिळाले मॅगसेसे पुरस्कार  

आतापर्यंत 60 कर्तृत्ववान भारतीयांचा मॅगसेसे पुरस्काराने गौरव केला गेला आहे. त्यापैकी विनोबा भावे, मदर टेरेसा, किरण बेदी, डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे, अरविंद केजरीवाल, सोनम वंगचूक, रवीश कुमार ही काही प्रसिद्ध नावं

Back to top button