

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अरूणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने आक्षेप नोंदवला. यावर भारतानेही अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अरूणाचल दौऱ्याला चीनचा विरोध चुकीचा असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी भारतीय नेते भारताच्या कोणत्याही राज्यात दौऱ्यासाठी गेल्यास त्यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. बागची म्हणाले, आम्ही चीनच्या प्रवक्त्यांकडून केलेली टीका पाहिली. आम्ही अशी विधाने नाकारत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अरूणाचल प्रदेश च्या दौऱ्यावर चीनी परराष्ट्र मंत्रालयाकडून झालेल्या विरोधा विषयी विचारले असता, त्यांनी वरील भूमिका मांडली. बागची म्हणाले, भारतीय नेते नियमितरीत्या अरूणाचल प्रदेशचा दौरा करतात. ज्या प्रकारे भारताच्या इतर राज्यात दौरे होतात. तसाच हा दौरा असतो. ते पुढे म्हणाले, भारताच्या एका राज्याचा भारतीय नेत्यांव्दारे दौरा केला जात असेल, तर त्यावर चीन कडून आक्षेप घेण्याचे कारण भारतीयांना समजत नाही.
चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियान यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अरूणाचल प्रदेश दौऱ्या विषयी बीजिंग मध्ये माध्यमांनी विचारले. त्या प्रश्नाला उत्तर देताना लिजियान यांनी चीनने कधीच या राज्याला मान्यता दिली नसल्याचे त्यांनी म्हटले. पुढे बोलताना त्यांनी सीमा वादावर चीनची भूमिका स्पष्ट आहे. चीनी सरकारकडून कधीच भारतीय पक्षांव्दारे एकतर्फी अवैधपणे घोषित केलेल्या अरूणाचल प्रदेशला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे चीन कोणत्याही भारतीय नेत्यांच्या येथील दौऱ्याला विरोध करतो.
लिजान यांनी म्हटलय की, दोन्ही देशातला सीमा वाद परस्पर चर्चेतून सोडवण्याला आमचे प्राधान्य आहे. मात्र भारताच्या अशा वागण्यामुळे सीमावाद आणखी क्लिष्ट होउ शकतो. दोन्ही देशांमधील शांतीपूर्ण संबंधांसाठी शक्यतो लवकर सीमा वादावर कारवाई झाली पाहिजे.
भारतीय नेत्यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने आक्षेप व्यक्त केला. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. पूर्व लडाखमधील भारत आणि चीन यांच्यातील 17 महिन्यांपासून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांकडून चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.
भारतीय सैन्याच्या म्हणण्यानुसार आमच्या रचनात्मक सूचनांवर चीनी पक्षाने सहमती दर्शवली ना कोणता मार्ग सूचवला. यावर चीनी सेनेच्या वेस्टर्न थिएटर कमांड कडून भारताकडून अव्यावहारिक आणि अवास्तव मागण्या समोर ठेवत असल्याच म्हटलं आहे.