Pune Murder : बायकोचा खून करून मृतदेह पुरला, चार मुले उघड्यावर
बायकोचा खून करून मृतदेह पुरून टाकल्याची घटना पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील वाखारी गावाच्या हद्दीत घडली आहे. (Pune Murder)
याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ८) रोजी सकाळी ११ च्या सुमारास वाखारी (ता. दौंड जि.पुणे) गावच्या हद्दीत पिरबाबा दर्गाजवळ ही घटना घडली. दरम्यान रमेश सुंदर वाघमारे (वय 30 रा. कोरली ता मुरूड जि. रायगड सध्या रा. वाखारी ता. दौंड जि. पुणे) पत्नी माया हे दोघे याच परिसरात राहतात. पैशाच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी रमेश वाघमारेने पत्नी मायाला मारहाण केली असता तिचा मृत्यू झाला.
Pune Murder : खून करून शेजारच्या जागेत पुरला
ती मृत झाल्याचे लक्षात येताच वाघमारेने तिचा मृतदेह शेजारील जागेत पुरून टाकला. यादरम्यान कोळसा व्यापारी नितीन सुरेश ठोंबरे हे कामानिमित्त वाखारी येथे रमेश वाघमारेकडे आले असताना तुझी बायको कुठं आहे असे विचारले. यावेळी तिला मी मारून टाकल्याचे तो म्हणाला. त्यानंतर नितीन ठोंबरे यांनी यवत पोलिसांत फिर्याद दिली.
यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपी रमेश वाघमारे याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले करत आहेत
चार मुले उघड्यावर
खून करणारा रमेश वाघमारे हा राना रानात फिरून कोळसा तयार करण्याचे काम करतो. स्वतःच्या पत्नीचा खून केल्याने त्यांना असणारी चार मुले उघड्यावर पडली आहेत. त्यांना यवत पोलिसांनी जेवणाची व्यवस्था करून तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था केली आहे.
- लखीमपूर : शेतकऱ्यांना रस्त्यावर चिरडणाऱ्या केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा पुत्र अटकेत
- बाभळ उगवली, कोकणाचा काय दोष; उद्धव ठाकरे यांची राणे यांच्यावर टीका
- Chipi Airport : उद्धवजी, मी बाळासाहेबांच्या प्रेरणेतूनच सिंधुदुर्गचा विकास केला : नारायण राणे
- पुण्याच्या रावण गँग मधील चौघांना सिनेस्टाईल पकडले; कराड तालुका पोलिसांची कारवाई

