

इस्लामाबाद; पुढारी ऑनलाईन : भारताने काहीही केलं तर त्याची कॉपी जणू पाकिस्तानात केलीच जाते. ती कोणत्याही गोष्टीत अथवा क्षेत्रात असो. सध्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' पदयात्रा काढत देशातील राजकीय वातावरण ढवळायला सुरु केले आहे. या यात्रेद्वारे त्यांना जनतेचा चांगला पाठिंबा मिळत आहे. आता याच स्टाईलची कॉपी करत पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लाहौर पासून इस्लामबाद असा लाँग मार्च अर्थात पदयात्रा काढली या यात्रेला सुद्धा इम्रान खान यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी या पदयात्रेला 'हकीकी आजादी मार्च' असे नाव दिले आहे. (Imran Khan's Long March)
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा 'हकीकी आझादी मार्च' आज लाहोरहून इस्लामाबादला रवाना झाला. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने सध्याच्या सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. इम्रान खान यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यादरम्यान त्यांनी पुन्हा एकदा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, ते आपल्यासारख्या निर्णयांमध्ये बाहेरील शक्तींचा हस्तक्षेप करू देत नाही. (Imran Khan's Long March)
इम्रान खान म्हणाले, भारत स्वत:च्या इच्छेने रशियाकडून तेल खरेदी करतो आणि पाकिस्तान गुलाम आहेत जो आपल्या देशातील लोकांच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाही. या देशाचे निर्णय देशातच घेतले पाहिजेत. रशिया स्वस्तात तेल देत असेल आणि देशवासीयांना वाचवण्याचा पर्याय आमच्याकडे असेल, तर आम्ही कोणाला विचारू नये. बाहेरच्या कोणीही येऊन आम्हाला हे सांगू नये. भारत रशियाकडून तेल घेऊ शकतो, पण गुलाम पाकिस्तानींना तसे करण्याची परवानगी नाही. (Imran Khan's Long March)
अधिक वाचा :