ICC Womens Emerging Cricketer : ‘इमर्जिंग क्रिकेटर ऑफ इयर’साठी एकाचवेळी दोन भारतीय महिला खेळाडुंना नामांकन

ICC Womens Emerging Cricketer : ‘इमर्जिंग क्रिकेटर ऑफ इयर’साठी एकाचवेळी दोन भारतीय महिला खेळाडुंना नामांकन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC ने महिला क्रिकेटमधील इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर 2022 साठी जगातील चार सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आहे. या चार नामांकित खेळाडूंपैकी भारतीय महिला संघातील दोन खेळाडूंचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघातील एक – एक महिला खेळाडूंचा समावेश आहे. (ICC Womens Emerging Cricketer)

या शॉर्टलिस्ट केलेल्या यादीत भारताकडून वेगवान गोलंदाज रेणुका सिंग (renuka singh) आणि फलंदाज यस्तिका भाटिया (yastika bhatia) या दोन महिला खेळाडुंचा समावेश आहे. या दोघांशिवाय ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डार्सी ब्राउन आणि इंग्लंडची फलंदाज अॅलिस कॅप्सी यांचीही आयसीसीने या पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. 2022 मध्ये या चार खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर टाकूया. (ICC Womens Emerging Cricketer)

2022 मध्ये रेणुका सिंगची जादुई कामगिरी (ICC Womens Emerging Cricketer)

रेणुका सिंगने यावर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये 14.88 च्या सरासरीने आणि 4.62 च्या इकॉनॉमीने एकूण 18 बळी घेतले आहेत. 23.95 च्या सरासरीने आणि 6.50 च्या इकॉनॉमीने धावा देत असताना, रेणुकाने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 22 विकेट घेतल्या आहेत. 26 वर्षीय रेणुका सिंगने गेल्या 12 महिन्यांत एकदिवसीय आणि T20 फॉरमॅटमध्ये 29 सामन्यांमध्ये तिने 40 बळी घेतले आहेत. ज्यामुळे या वर्षाच्या सुरुवातीला निवृत्त झालेल्या महान भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा रेणुका सिंगने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.

एकदिवसीय सामन्यांतील 18 विकेटपैकी रेणुकाने इंग्लंडविरुद्धच्या 2 सामन्यात 8 बळी आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 7 बळी घेतले. रेणुकाने या वर्षी 7 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला खूप त्रास दिला आणि त्यांच्या विरुद्ध 8 विकेट घेतल्या. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत आणि आशिया चषक स्पर्धेत या भारतीय वेगवान महिला गोलंदाजाने 11 सामन्यात केवळ 5.21 च्या इकॉनॉमीने 17 विकेट घेतल्या आहेत. या जबरदस्त कामगिरीमुळे ती भारतातील सर्वात विश्वासार्ह गोलंदाज बनली आहे. (ICC Womens Emerging Cricketer)

2022 मध्ये यास्तिका भाटियाची दमदार फलंदाजी

भारतीय फलंदाज यास्तिका भाटियाने 2022 मध्ये फलंदाज म्हणून दमदार कामगिरी केली आहे. तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 25.06 च्या सरासरीने आणि 73.29 च्या स्ट्राइक रेटने 376 धावा केल्या. भाटियाला टी-20 इंटरनॅशनलमध्ये जास्त संधी मिळाली नाही. तिने टी २० फॉरमॅटमध्ये 12.25 च्या सरासरीने आणि 80.32 च्या स्ट्राइक रेटने 49 धावा जोडल्या आहेत. 22 वर्षीय यास्तिकाने भारतीय महिला संघाला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून नवा आणि मजबूत पर्याय दिला आहे.

2022 मध्ये डार्सी ब्राउनची दमदार कामगिरी

ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज डी'आर्सी ब्राउनने 2022 मध्ये 28.50 च्या सरासरीने 2 कसोटी बळी घेतले. ब्राऊनने वनडेमध्ये 24.50 च्या सरासरीने आणि 4.90 च्या इकॉनॉमीने 10 विकेट घेतल्या आहेत. या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 22.83 च्या सरासरीने आणि 6.20 च्या इकॉनॉमीने 12 बळी घेतले. ब्राऊनने 2022 मध्ये एकूण 24 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत तिची आकडेवारी रेणुकाच्या जवळपास निम्मी आहे.

2022 मध्ये  एलिस कॅप्सीची बॅट तळपली

इंग्लंडची फलंदाज अॅलिस कॅप्सीने 2022 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये 20 च्या सरासरीने आणि 94.11 च्या स्ट्राइक रेटने 80 धावा केल्या. त्याने 33.42 च्या सरासरीने आणि 127.86 च्या स्ट्राइक रेटने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 234 धावा करून इंग्लंडसाठी आपली योग्यता सिद्ध केली आहे. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी इंग्लंडच्या कॅप्सीने या वर्षी आपल्या कामगिरीने खूप चर्चेत आली आहे.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news