ICC Rankings Virat Kohli: विराटची आयसीसी टेस्ट क्रमवारीत झेप, गोलंदाजीत अश्विन अव्वल स्थानी कायम

ICC Rankings Virat Kohli: विराटची आयसीसी टेस्ट क्रमवारीत झेप, गोलंदाजीत अश्विन अव्वल स्थानी कायम
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Rankings Virat Kohli : आयसीसीच्या (ICC) ताज्या कसोटी क्रमवारीत विराट कोहलीला (Virat Kohli) जबरदस्त फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध अहमदाबाद येथे खेळवल्या गेलेल्या कसोटीत विराटने शानदार शतकी खेळी साकारली, ज्यामुळे त्याने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. विराट याआधी कसोटी फलंदाजांच्या यादीत 20 व्या क्रमांकावर होता, पण आता तो 13व्या स्थानावर पोहोचला आहे.

विराट कोहलीने (Virat Kohli) तब्बल तीन वर्षांनंतर कसोटीत शतकांचा दुष्काळ संपवला. त्याने शतक तर झळकावलेच पण त्याचबरोबर टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहचवले. विराट दुहेरी शतकाच्या अगदी जवळ होता, मात्र तो 186 धावांवर बाद झाला. यानंतरही विराटने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तसेच भारताचा विकेटकीपर ऋषभ पंत (Rishbh Pant) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) टॉप 10 फलंदाजांच्या यादीत कायम आहेत. पंत नवव्या तर हिटमॅन दहाव्या स्थानावर आहे.

कोण आहे अव्वल फलंदाज?

आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन (915 रेटींग) पहिल्या स्थानावर आहे. स्टीव्ह स्मिथ (872) दुसऱ्या, जो रूट (871) तिसऱ्या, बाबर आझम (862) चौथ्या आणि ट्रॅव्हिस हेड (853) पाचव्या स्थानावर आहेत.

याच मालिकेत शानदार फलंदाजी करणाऱ्या अक्षर पटेल (Akshar Patel) यालाही फायदा झाला आहे. तो फलंदाजी क्रमवारीत आठ स्थानांची प्रगती करून 44 व्या स्थानी पोहचला आहे. यासोबतच अक्षरने (316) अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत एका स्थानाने पुढे जात चौथे स्थान काबिज केले आहे. या यादीत रवींद्र जडेजा (431) पहिल्या, आर अश्विन (359) दुसऱ्या, बांगलादेशचा शाकिब अल हसन (329) तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना फायदा

ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांची सुधारणा झाली आहे. तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे. अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने 11 स्थानांची झेप घेत फलंदाजांच्या यादीत 26 ने स्थान मिळवले आहे. ट्रॅव्हिस हेडने 853 रेटिंगसह कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पाचवे स्थान कायम राखले आहे.

अश्विन नंबर वन

भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनने (869 रेटींग) नंबर वन गोलंदाज म्हणून आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. याआधी जेम्स अँडरसन (859) आणि त्याच्यात अटीतटीचा सामना सुरू होता. पण अश्विनने आता अँडरसनला 10 रेटींगने मागे टाकून एकहाती स्थान राखले आहे. अश्विनने बॉर्डर गावसकर मालिकेत 17.28 च्या सरासरीने 25 विकेट घेतल्या आणि रवींद्र जडेजासह टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडूही ठरला. गोलंदाजांच्या यादीत पॅट कमिन्स (841) तिसऱ्या, कागिसो रबाडा (825) चौथ्या आणि शाहीन आफ्रिदी (787) पाचव्या स्थानावर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news