Neetu Chandra : बिझनेसमॅनकडून ऑफर! ‘पगारी बायको’ म्हणून दरमहा २५ लाख देतो; अभिनेत्री नीतू चंद्राचा धक्कादायक खुलासा

Neetu Chandra : बिझनेसमॅनकडून ऑफर! ‘पगारी बायको’ म्हणून दरमहा २५ लाख देतो; अभिनेत्री नीतू चंद्राचा धक्कादायक खुलासा
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : एका व्यावसायिकाने आपल्याला 'पगारी बायको' (Salaried Wife) होण्यासाठी दरमहा २५ लाख रुपयांची ऑफर दिली होती, असा खळबळजनक खुलासा अभिनेत्री नीतू चंद्रा (Actress Neetu Chandra) हिने केला आहे. 'गरम मसाला', 'ट्रॅफिक सिग्नल' आणि 'ओये लकी लकी ओये' यासारख्या चित्रपटांमध्ये नीतू चंद्राने भूमिका केल्या आहेत. 'नेव्हर बॅक डाउन : रिव्हॉल्ट' (Never Back Down: Revolt) या चित्रपटातून तिने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

नीतू गेल्या बऱ्याच वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. तिने २००५ मध्ये अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम स्टारर 'गरम मसाला' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात तिने एअर होस्टेसची भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्ये येण्याआधी ती जाहिरात उद्योगात सक्रिय होती. जाहिरात उद्योगाचा प्रमुख चेहरा म्हणून प्रसिद्ध होती. तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. नीतू आणि तिचा भाऊ चित्रपट निर्माते नितीन चंद्रा यांची निर्मिती असलेल्या 'मिथिला मखान' (Mithila Makhaan) या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

नीतूने ((Actress Neetu Chandra) बॉलिवूड हंगामा या पोर्टलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की तिची कहाणी ही एका यशस्वी कलाकाराच्या अपयशाची कहाणी आहे. १३ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांसोबत काम केले. यशस्वी कारकीर्द असूनही आपल्याला आता इंडस्ट्रीत काम नसल्याचे सांगत नीतू भावूक झाली. एका व्यावसायिकाने आपल्याला 'पगारी बायको' होण्यासाठी २५ लाख रुपयांची ऑफर दिल्याच्या घटनेचा उल्लेख तिने बोलताना पुन्हा पुन्हा केला.

आपल्या मनात अनेकवेळा आत्महत्येचा विचार आला. ती पुढे म्हणाली, "मी श्वास गुदमरून मरण पत्करू का? लोक गेल्यानंतरच त्यांच्या कामाला ओळख मिळेल का? जे पाऊल सुशांतने उचलले, किती सगळे लोक विचार करतात…"
नीतू एका घटनेबद्दल बोलताना म्हणाली, "मला एका कास्टिंग डायरेक्टरने एका भूमिकेसाठी ऑडिशन देण्यास सांगितले होते. पण एका तासाच्या आत भूमिकेसाठी नकार देण्यात आला. अशा घटनांमुळे माणसाचा आत्मविश्वास खचतो."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news