रश्मिकाची हिंदीत चांदी! | पुढारी

रश्मिकाची हिंदीत चांदी!

‘पुष्पा’मुळे हिंदी पट्ट्यातही रातोरात स्टार झालेल्या रश्मिका मंदानाची स्थिती आता ‘पांचो उंगगियाँ घी में’ अशी झाली आहे. सध्या बॉलीवूडमध्ये तिला मोठीच मागणी असून तिनेही अनेक बड्या हीरोंबरोबर हिंदी चित्रपट स्वीकारण्याचा धडाका लावला आहे. सध्या बॉलीवूडमध्ये हीरोईनचीच चणचण असल्याने रश्मिकाचा भाव वधारला आहे.

प्रियांका अमेरिकेला गेली आहे, आलिया प्रेग्नंट आहे, दीपिका भलतीच चोखंदळ झाली आहे, अनुष्का शर्मा लेकीच्या संगोपनात गुंतली आहे, सोनम कपूरही गर्भवती आहे, कॅटरिना लग्न करून संसाराला लागली आहे…अशी यादी वाढतच चालली आहे. त्यामुळे ‘पुष्पा’नंतर रश्मिकाची लोकप्रियता वाढल्याने बॉलीवूडच्या निर्मात्यांना तिच्यामध्ये आपल्या चित्रपटाचीही हीरोईन दिसू लागली आहे.

सध्या ती सिद्धार्थ मल्होत्राबरोबर ‘मिशन मजनू’ करीत असून ‘गुडबाय’मध्ये ती अमिताभ बच्चन यांच्यासमवेत झळकणार आहे. रणबीर कपूरबरोबर ती ‘अ‍ॅनिमल’ करीत असून एका आगामी चित्रपटात टायगर श्रॉफबरोबरही दिसणार आहे.

Back to top button